अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन घेतात ‘या’ मराठी खलनायिका; आकडा पाहून धक्काच बसेल

मुंबई | मंडळी मालिका विश्वात सतत काही ना काही कट कारस्थान पाहायला मिळते. यामध्ये नायिकेपेक्षा खलनायिका जास्त प्रसिध्दी झोतात असतात. अशात मालिका विश्वातील खलनायक कमी आणि खलनायिका जास्त असतात. कारण मालिका या कौटुंबिक असतात. अशात या खलनायिका आपल्या अभिनयासाठी कधीकधी नयिकेपेक्षाही अधिक मानधन घेताना दिसतात. त्यामुळे आज या बातमीतून मराठी मालिका विश्वातील काही खलनायिका आणि त्यांचे मानधन या विषयी माहिती घेऊ.

रुपाली भोसले
आई कुठे काय करते या मालिकेने आज मोठा उच्चांक गाठला आहे. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम अरुंधतीला मिळत आहे. मात्र तिला हे प्रेम संजनामुळे मिळालेलं आहे. हे नाकारून चालणार नाही. मालिकेत रुपाली भोसले ही अभिनेत्री संजना हे पात्र साकारते. तिने संजना या पात्राला पूर्णतः न्याय दिला आहे. त्यामुळेच आज ती देखील या मालिकेमुळे खूप प्रसिद्ध झाली आहे. अशात ही संजना तब्बल ४२ हजार रुपये एवढं मानधन तिच्या एका एपिसोड साठी घेते.

माधवी निमकर
माधवी निमकर ही अभिनेत्री सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसते. यामध्ये ती शालिनी हे पात्र साकारते. शालीनीची गावाकडील भाषेतील डायलॉग फेकण्याची पद्धत चाहत्यांना खूप आवडते. मालिकेत ती सतत गौरीला त्रास देताना दिसते. तिच्यामुळे गौरीला अनेकदा पळता भुई थोडी झाली आहे. अशात ही अभिनेत्री एका भागाचे ३९ हजार रुपये मानधन घेते.

अनघा भगरे
दिसायला एवढी सुंदर की, कुणीही तिच्या प्रेमात पडेल. तसेच चेहरा पाहून वाटेल की, किती गोड मुलगी आहे. मात्र रंग माझा वेगळा या मालिकेत या अभिनेत्रीने देखील चांगलेच रंग उधळले आहे. ती या मालिकेत श्वेता हे पात्र साकारते. आता पर्यंत दिपाच्या आयुष्यात तिने खूप अडचणी आणल्या आहेत. मालिकेतील तिचा अभिनय खरोखर कौतुकास्पद आहे. त्यामुळे अनघा एका एपिसोड साठी २५ हजार रुपये एवढं मानधन घेते.

शीतल क्षीरसागर
माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका तुम्ही हमखास पाहत असाल. यामध्ये सिम्मी काकू ही भूमिका अभिनेत्री शीतल साकारते. शीतल बऱ्याचदा खलनायिकेच्या भूमिकेतच दिसली आहे. या मालिकेत देखील ती खाष्ट सासू दाखवली आहे. आपल्या जबरी अभिनयासाठी ती १८ हजार रुपये प्रत्येक भागाचे मानधन घेते.

विदिशा मस्कर
रंग माझा वेगळा या मालिकेत आणखीन एक खलनायिका आहे. तिचं नाव आहे आयेशा. मालिकेत ही थोडी अल्लड आणि बावळट दाखवली आहे. मात्र दिपाला त्रास देण्याची एकही संधी ती सोडत नाही. अशात तिचा अभिनयासाठी ती एका एपिसोड साठी २१ हजार रुपये एवढे मानधन घेते.

आभिज्ञा भावे
स्वप्नील जोशी अभिनित तू तेव्हा तशी ही मालिका खूप कमी काळात गाजत आहे. मालिकेत पुष्पवल्ली हे पात्र अभिज्ञा साकारते आहे. तिने आपल्या या विरोधी भूमिकेला घराघरात पोहोचवले आहे. त्यामुळे ती एका भागासाठी २८ हजार रुपये मानधन घेते.

रीना अग्रवाल
अनेक मालिकांमध्ये दोन खलनायिका दाखवल्या जातात. मन उडू उडू झालं या मालिकेत ही एकच अभिनेत्री दिपू आणि इंद्राला त्रास देण्यास पुरून उरत आहे. तिने आता पर्यंत इंद्रा आणि दिपूला खूप त्रास दिला आहे. याच त्रासाचे ही अभिनेत्री एका एपिसोड साठी ११ हजार रुपये मानधन घेते.

किशोरी अंबिये
सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत खलनायिकेची भूमिका किशोरी अंबिये साकारतात. या मालिकेमध्ये त्या आशा आहे पात्र साकारत आहेत. त्यांचे पात्र नकारात्मक असले तरी त्यांना प्रेक्षकांची खूप लोकप्रियता मिळालेली आहे. आपल्या दमदार अभिनयासाठी त्या एका भागाचे १९ हजार रुपये एवढे मानधन घेतात.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *