मालिकेत माय लेकी असलेल्या ‘या’ अभिनेत्री खऱ्या आयुष्यात झाल्या आहेत सासू -सूना…

मुंबई | मालिका विश्वात काम करताना अनेक ठिकाणी कुटुंब दाखवले जाते. यामध्ये आई, मुलगी, भाऊ, बाबा, आजोबा असा मोठा परिवार देखील दाखवला जातो. अशात पुढे जाऊन पती पत्नीच्या नात्या व्यतिरिक्त सासू सुनेची नाती खरी ठरतील याची कुणालाच काही कल्पना नसते. अशात मराठी मालिका विश्वातील एका अभिनेत्री बरोबर अशी नाती जोडली गेली आहेत. त्या अभिनेत्रीच नाव आहे हृता दुर्गुळे. हृताने काही महिन्यांपूर्वी प्रतीक शाह या व्यक्ती बरोबर विवाह केला.

प्रतिमा हा एक निर्माता आणि गायक आहे. तसचं तो दिग्दर्शन देखील करतो. आजवर त्याने अनेक हिंदी मालिकांसाठी काम केलं आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी, इक दिवाना था , मनमोहिनी  या मालिकांसाठी काम केलं आहे. त्याच्या आईचे नाव मुग्धा शाह असे आहे. मुग्धा या देखील एक अभिनेत्री आहेत. त्यांनी देखील आजवर मराठी तसेच हिंदी मलिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्यांचा अभिनय देखील खूप उत्तम आहे.

त्यांनी आता पर्यंत अनेक मालिकांमध्ये कलाकारांच्या आईची आणि सासूची भूमिका साकारली आहे. तसेच त्यांनी चित्रपटांमध्ये देखील काही दमदार भूमिका केल्या आहेत. त्यांनी बे दुणे साडे चार, मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं हे पंढरपूर, पुछो मेरे दिल से, संभव असंभव अशा काही मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

त्यांनी दुर्वा या मालिकेत देखील अभिनय केला आहे. हृताची ही पहिलीच मालिका होती. यामध्ये या दोघींनी माय लेकीची भूमिका केली होती. या मालिकेतील अभिनयाने देखील हृता विशेष प्रसिद्ध झाली. अशात या मालिकेत काम करत असताना या दोघी मायलेकी पुढे जाऊन खऱ्या आयुष्यात सासू आणि सुनेचे कर्तव्य बजावतील याची दोघींना देखील कल्पना नव्हती.

हृताने  दुर्वा या मालिकेनंतर फुलपाखरू या मालिकेत काम केले. याच मालिकेने तिला विशेष प्रसिध्दी दिली. यामधून ती मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाली. अशात आता छोट्या पडद्यावर झळकणारी ही अभिनेत्री आता मोठा पडदा देखील गाजवणारा आहे. अनन्या आणि टाईमपास ३ या चित्रपटात ती दिसणार आहे. त्यामुळे तिने सध्याची मन उडू उडू झालं या मालिकेतून निरोप घेतला आहे. तसेच या मालिकेतील तिचा सहकलाकार अजिंक्य राऊत याच्या समोर देखील अनेक नवीन प्रोजेक्ट आहेत. त्यामुळेच मन उडू उडू झालं ही मलिका आता बंद होणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *