विश्वचषक पाहता येणार आता थिएटरमध्ये; वाचा सविस्तर 

दिल्ली | ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 16 ऑक्टोबर पासून विश्वचषक सामाना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान सोबत रंगणार आहे. यंदाच्या विश्वचषकात एकूण 16 संघ सहभागी होणार असून त्यांच्यात होणारे रोमांचक सामने सर्व क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. अशातच आता यात क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी पुढं आलीये.

टीम इंडियाचे जेवढे सामने होणार आहेत, ते सगळे सामने तुम्हाला थिअरटरमध्ये पाहायला मिळणार आहेत. मल्टीप्लेक्स कंपनी इनोक्स ही सगळे सामने दाखवणार आहे. विशेष म्हणजे मल्टीप्लेक्स कंपनी इनोक्ससोबत आयसीसीने करार केला आहे.भारतात टीम मल्टीप्लेक्स कंपनी आयनॉक्सचे पंचवीस शहरात सुविधा उपलब्ध आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेसाठी टीम इंडिया – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.

T20 विश्वचषक 2022 मध्ये टीम इंडियाच्या मॅच :
• भारत विरुद्ध पाकिस्तान, 23 ऑक्टोबर, दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)
• भारत विरुद्ध गट अ उपविजेता, 27 ऑक्टोबर, दुपारी 12.30 वाजता (सिडनी)
• भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 30 ऑक्टोबर, दुपारी 4.30 (पर्थ)
• भारत विरुद्ध बांगलादेश, 2 नोव्हेंबर, दुपारी 1.30 वाजता (अ‍ॅडलेड)
• भारत विरुद्ध गट ब विजेता, 6 नोव्हेंबर दुपारी 1.30 वाजता (मेलबर्न)

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *