आईसाठी शेवटपर्यंत केली नोकरी; प्रदिप पटवर्धन यांचा तो किस्सा पाहून डोळ्यात पाणी येईल

मुंबई | दिग्गज अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोक सागरत विलीन झाला आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी हृदय विकरच्या झटक्याने राहत्या घरी त्यांची प्राण ज्योत मालवली. आज दुपारी ३ वाजता झावबा वाडी येथील ठाकुरद्वारयेथून त्यांच्या अंत्य यात्रेला सुरुवात होणार आहे.

प्रदीप यांनी आजवरच्या त्यांच्या कारकिर्दीने अनेकांच्या मनात मोलाचं स्थान निर्माण केलं आहे. मोरूची मावशी हे नाटक त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला कलाटणी देणारे ठरले. यात त्यांनी भैया पाटील ही व्यक्तिरेखा साकारली होती. याच नाटकाने त्यांना प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवलं.

त्यानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर देखील दमदार कामगिरी केली. नवरा माझा नवसाचा, 1234, लावू का लाथ, एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, गोळा बेरीज, जर्नी प्रेमाची, थँक्यू विठ्ठला, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. हे असे चित्रपट आहेत ज्यात त्यांच्या भूमिका खूप हिट ठरल्या.

प्रदीप पटवर्धन हे मुंबई मधील सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकत होते. अभिनेते विजय पटवर्धन हे देखील याच कॉलेजमध्ये शिकत होते. एका कार्क्रमादरम्यान विजय आणि प्रदीप हे दोघेही आले होते. त्यावेळी विजय यांनी सांगितले की, ” प्रदीप आमच्या कॉलेजात एक हँडसम बॉय म्हणून प्रसिद्ध होता. अनेक मुलींच्या नजरा त्याच्या एन्ट्री कडे आयाच्या. अगदी अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणे त्याची कॉलेजमध्ये एन्ट्री व्हायची. त्याला खूप गर्लफ्रेंड होत्या. आम्हाला एक बायको सांभाळत नाही तिथे तो ४ गर्लफ्रेंड सांभाळायचा.” यावर प्रदीप यांनी हसत हसत हे खोटं आहे मला एकही गर्लफ्रेंड नव्हती असं सांगितलं.

याच मुलाखतीत विजय यांनी पुढे असं सांगितलं की, ” गोविंदा आला की, सगळ्यांना प्रदीपच्या डान्सची ओढ लागत होती. कारण तो खूप भन्नाट नचायचा. त्याला पाहण्यासाठी आता जशी शरुख साठी गर्दी जमते तशी गर्दी उफाळून यायची.” यावर प्रदीप म्हणाले होते की, ” मला गोविंदामध्ये नाचण्याची आधीपासूनच खूप आवड होती.

त्यामुळे मी तिथे मनोसोक्त नाचायचो आणि आजही नाचतो. बँजो पेक्षा कच्छी वर नाचण्याची मजाच निराळी आहे. एकदा गिरगाव येथे गोविंदात नाचत असताना चौथ्या मजल्यावरून प्रदीप यांच्यासाठी खाऊची एक पिशवी आली होती. त्यात जिलेबी आणि बर्फी होती. असे त्यांनी सांगितले.

अशात विजय पाटकर यांनी एकदा प्रदीप यांचा असाच आणखीन एक रंजक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, ” प्रदीप मोरूची मावशी हे नाटक सुरू असताना आधीच निर्माते सुधीर भट यांच्याकडून जातीची तिकिटे घेत होता आणि ब्लॅकमध्ये विकत होता.” यावर आपलं मत देत प्रदीप म्हणाले होते की, ” हे नाटक माझ्या एन्ट्रीने सुरू व्हायचं. त्यामुळे मी नाटकात एन्ट्री घेणार की ब्लॅक मध्ये तिकिटे विकणार.”

प्रदीप पटवर्धन हे उत्तम अभिनेत्या बरोबर एक श्रावण बाळ देखील होते. त्यांनी नेहमीच आपल्या आईचे सर्व म्हणजे ऐकले. त्यांच्या आईने त्यांना तीन गोष्टींचे पालन करण्यास सांगितले होते. एक म्हणजे कधीच नोकरी सोडायची नाही. दुसरं म्हणजे नाटकात देखील काम करायचं आणि तिसरं म्हणजे लोकांना नेहमी हसवत रहायचं. आपल्या आईच्या तिन्ही आज्ञा प्रदीप यांनी कायम पाळल्या. आई साठीच त्यांनी बँकेतली नोकरी कधीच सोडली नाही. त्यांची आई नसताना त्यांना अनेकदा याचं दुःख झालं की, आपली आई आपली अभिनयातील प्रगती पाहायला आपल्या जवळ नाही.

प्रदीप बँक ऑफ इंडिया येथे नोकरी करत होते हे फार कमी लोकांना माहीत आहे. साल २०१८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. मात्र त्यांनी कधीच नोकरीचा कंटाळा केला नव्हता. ते सकाळी ६ ते २ नोकरी करायचे नंतर घरी आल्यावर नाटकांच्या दौऱ्यांवर जायचे. यावेळी घरी यायला रात्रीचा कितीही उशीर झाला तरी ते सकाळी बरोबर ६ ला ऑफिसर हजर रहायचे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *