ऑस्कर पुरस्कार जिंकला मात्र आयुष्याच्या शर्यतीत हारला; प्रसिध्द बाल कलाकाराचे निधन

गुजरात | यंदाच्या ऑस्करच्या पुरस्कारासाठी अनेक चित्रपटांची नावं घेण्यात आली. परंतु यात गुजराती भाषेच्या ‘छेल्लो शो’ या चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत उभ केल आणि त्याला नोमिनेट करण्यात आल होत. हा चित्रपट येत्या 14 तारखेला रिलीज होणार होता. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटातील राहुल कोली या अभिनेत्याचा ब्लड कॅन्सरच्या अकरा निधन झालं.

राहुल गुजरातच्या जामनगरमधील हापा गावात आपल्या कुटुंबासह राहत होता. राहुलच्या कुटुंबीयांनी माहिती दिली की, राहुलच्या मृत्यूपूर्वी त्याला वारंवार ताप येत होता आणि त्याला रक्ताच्या उलट्याही होत होत्या. राहुलचे वडील रामू कोली हे रिक्षाचालक आहेत. एका मुलाखतीमध्ये रामू यांनी सांगितलं, ‘तो खूप आनंदी होता आणि तो मला अनेकदा सांगत होता की 14 ऑक्टोबरनंतर आपले जीवन बदलेल. पण त्याआधीच तो आम्हाला सोडून गेला.’

14 ऑक्टोंबरला रिलीज होणार चित्रपट पण त्याआधीच राहुल सोडून गेला – चित्रपटाचे दिग्दर्शक पॅन नलिन आहेत. सहा बाल कलाकारांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात राहुलनं मनु ही भूमिका साकारली. मनु हा रेल्वे सिग्नलमॅनचा मुलगा असतो. हा चित्रपट येत्या 14 तारखेला रिलीज होणार आणि आपले दिवस बदलणार अशी त्याला अशा होती. परंतु याधीच राहुलन अखेरचा श्वास घेतला.

ब्लड कॅन्सरन संपवलं जीवन – ब्लड कॅन्सर म्हणजेच ल्युकेमिया या आजारान ग्रासलेल्या राहुलवर गेल्या चार महिन्यांपासून अहमदाबाद येथील गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये उपचार सुरू होते. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर 4 महिन्यांनी राहुलला हा आजार झाल्याचं निदान झालं.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *