ठिपक्यांची रांगोळीमध्ये विशाखा सुभेदारची एन्ट्री, अप्पू आणि शशांकचा घटस्फोट थांबवणार का?

मुंबई | महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांमध्ये अनेक विनोदी कलाकार आपण पाहिले. त्यातीलच एक विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदारने तिच्या विनोदी अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव कमावले आहे. मात्र काही दिवसांपूर्वी तिने महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाला रामराम ठोकला. त्यावेळी तिने रीतसर एक पोस्ट लिहून ती महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडत असल्याची माहिती दिली. यावेळी सर्व चाहते थोडे निराश झाले होते. मात्र चाहत्यांची ही निराशा आता लगेचच दूर होणार आहे.

कारण विशाखा सुभेदार ही आता ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये एन्ट्री करत आहे. टिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये अप्पू आणि शशांक हे दोन्ही कलाकार सर्वाधिक पसंतीच्या आहेत. अप्पूचा अल्लडपणा रसिक प्रेक्षकांना खूप आवडतो. मात्र आता या मालिकेमध्ये थोडा गोंधळ सुरू असलेले दिसत आहे. अप्पू आणि शशांक या दोघांमध्ये भांडण झाली असून दोघेही आता घटस्फोट घेणार आहेत.

या दोघांचा घटस्फोट होऊ नये त्यामुळेच मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये एका नवीन पात्राची एन्ट्री होत आहे. लग्न सल्लागार अशी व्यक्तीरेखा साकारण्यासाठी विशाखा सुभेदार ही या मालिकेमध्ये एन्ट्री करत आहे. विशाखाच्या एंट्रीने मालिकेला एक नवीन ट्रस्ट आला आहे.

विशाखाने महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडला तेव्हा तिने या कार्यक्रमातील अनेक आठवणी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केल्या होत्या. मी हा कार्यक्रम माझ्या मर्जीने सोडत आहे असं ती म्हटली होती. माझं वय झालं आहे आणि मला आता विनोदी अभिनय करता येत नाही किंवा मला आणखीन मोठे कोणती ऑफर मिळाली आहे म्हणून मी हा कार्यक्रम सोडते या निव्वळ अफवा आहेत असे देखील तिने यावेळी सांगितलं होतं.

महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांमध्ये नवोदित कलाकार येत आहेत. त्यांना देखील अभिनयाची संधी मिळावी असं मला वाटतं. तसेच मला देखील वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. त्यामुळे मी जत्रा सोडत असून नवीन मालिकेत दिसणार आहे. असं विशाखा नाही तिच्या फेसबुक पोस्ट मधून सांगितलं होतं.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *