‘दे धक्का २’ मध्ये सायलीच्या भूमिकेत मेहश मांजरेकर यांची मुलगी का आहे? खरं उत्तर आलं समोर

मुंबई | साल 2008 मध्ये दे धक्का हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. यातील मकरंद जाधवने लावलेला इंजिंचा शोध त्याला अब्जाधीश बनवून गेला. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे महेश मांजरेकर यांनी पुन्हा एकदा या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दे धक्का 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

दे धक्का 2 मध्ये देखील अशीच धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. यात मकरंद आता त्याची नवीन गाडी रस्त्यावर उभी करतो आहे. बाकीच्यांनी मारुती आणला मग आपला हनुमान आलाच पाहिजे असं म्हणत तो आपली नवीन गाडी लॉन्च करणार आहे. त्याच्या गाडीच नाव हनुमान आहे. ही गाडी देखील चित्रपटात विशेष रंगत आणणार आहे.

दे धक्का 2 मध्ये किसना, सायली, सुमती, मकरंद, तात्या हेच पात्र कायम आहेत. यातील कलाकार देखील तेच आहेत. मात्र सायली हे पात्र साकारलेली चिमुकली यात बदलेली आहे. दे धक्का या चित्रपटात सायली हे पात्र अभिनेत्री गौरी वैद्य हिने साकारले होते. तिचा अभिनय आणि डान्स या दोन्ही गोष्टींनी ती खूप गाजली होती. मात्र आता दे धक्का 2 मध्ये सायली हे पात्र गौरी इंगवले साकारणार आहे. ती महेश मांजरेकर यांची मुलगी आहे.

ही बाब लक्षात येताच महेश मांजरेकर याना गौरी वैद्य बद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तिला या चित्रपटात का घेतलं नाही? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी महेश यांनी सांगितले की, ” गौरी वैद्य ही एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सर आहे. दे धक्का या चित्रपटात तिने आम्हाला खूप साथ दिली. मात्र आता ती मोठी झाली आहे.

तसेच तिच्यात खूप बदल झाला आहे. शिवाय तिने आता अभिनय हे क्षेत्र सोडले आहे. ती आता इंजिनिअरींग करते आहे. त्यामुळे आम्ही तिला या चित्रपटात घेऊ शकलो नाही. आम्ही आमची सायली खूप शोधली मग आम्हाला गौरी इंगवले सायली म्हणून परफेक्ट वाटली. ” असं महेश यांनी सांगितलं आहे.

अशात गौरी इंगवले ही महेश यांचीच मुलगी असल्याने त्यांनी तिला आणखीन एक संधी दिली आहे असं म्हटल जातं आहे. मात्र गौरी इंगवलेने या आधी कुटुंब आणि पांघरून या चित्रपटात दिसली होती. यावेळी तिचा जबरदस्त अभिनय आणि तिचा डान्स पाहायला मिळाला होता. त्यामुळे ती सायली हे पात्र आणखीन छान साकारणार यात काही शंका नाही. अशात आता गौरी वैद्य सिनेविश्वात नाही. त्यामुळे ती आता किती मोठी झाली आहे ती नेमकी कशी दिसते. असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *