करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक असून देखील रतन टाटा यांनी लग्न का नाही केले??

मुंबई | टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांची व्यावसायिक क्षेत्रातील झेप आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यांनी वाढवलेल्या व्यवसायाचा पसारा हा खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील संपूर्ण वेळ टाटा व्यवसायाच्या वाढीसाठी खर्च केला आहे. रतन टाटा यांना प्राण्यांचा खूप जास्त लळा आहे.

त्यांना मुके जीव खूप आवडतात. एवढे श्रीमंत व्यक्ती असून देखील त्यांचा स्वभाव अतिशय नम्र आहे. त्यांच्या याच स्वभावामुळे त्यांचे एखाद्या कलाकाराहून जास्त फॅन आहेत. रतन टाटा प्रत्येक व्यक्तीशी नम्रपणे आणि आपुलकीने संवाद साधतात. आपल्याकडे असलेली संपत्ती आणि सुख सोयी यांचा त्यांनी आतापर्यंत कधीच गैरवापर केलेला नाही. विशेष म्हणजे भारतावर जेव्हा जेव्हा संकटे आलेली आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

रतन टाटा हे अद्याप अविवाहित आहेत. त्यांनी अजूनही लग्न केलेले नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांनी टाटा ग्रुप साठी वाहिले आहे. मात्र त्यांनी लग्न का केले नाही? त्यांना कुणी चांगली मुलगी भेटली नाही का? असे अनेक प्रश्न सर्व सामान्यांच्या मनामध्ये येत असतात. तर आज या बातमीमधून रतन टाटा यांच्या आयुष्यातील लग्न या विषयाची माहिती घेणार आहोत.

अनेकांना असे वाटते की, रतन टाटा यांना कधी लग्न करावेसे वाटलेच नाही. त्यांना आवडेल अशी मुलगी त्यांना भेटली नाही. मात्र हे अर्ध सत्य आहे. यातील खरं सत्य आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एकदा तरी प्रेमात पडतो. अशात हे प्रेम खरं असेल आणि ते यशस्वी झालं नाही तर व्यक्ती पुन्हा कधीच प्रेमाच्या नादात पडत नाही.

असाच काहीसा प्रकार रतन टाटा यांच्याबरोबर देखील घडला आहे. रतन टाटा यांना एक मुलगी आवडत होती. मात्र काही कारणास्तव ते तिच्याशी लग्न करू शकले नाही. त्यामुळे आयुष्यभर त्यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या लग्न विषयीची ही माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. एका मुलाखतीमध्ये बोलत असताना त्यांनी याविषयी सांगितले होते. रतन टाटा करून असताना सुरुवातीच्या कारकिर्दीत लॉस एंजेलिसमधील आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करत होते. परदेशी आपल्या कुटुंबीयांपासून दूर होते या कामामध्ये खूप रमले होते. इथेच त्यांच्या आयुष्यात एक मुलगी आली. जिल्हा पाहता क्षणी रतन टाटा तिच्या प्रेमात पडले. त्या मुली बरोबर त्यांनी मैत्री केली त्यानंतर दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. दोघांनी लग्न करून सुखी संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या दरम्यान रतन टाटा यांच्या आजी फार आजारी झाल्या.

त्यामुळे त्यांना मायदेशी परतावे लागले. तिकडे आल्यानंतर आजी वरती उपचार करून ते पुन्हा एकदा त्यांच्या प्रेयसीला घेण्यासाठी परदेशी जाणार होते. मात्र त्याच दरम्यान भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू होते. त्यामुळे त्यांच्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्यांना भारतात पाठवण्यास नकार दिला. या घटनेमुळे रतन टाटा त्यांच्या आवडत्या मुलीशी लग्न करू शकले नाही.

या प्रसंगामुळे ते खूप दुःखी झाले होते. त्यांची काही चूक नसताना सुद्धा त्यांना आपल्या प्रेमाला मुकावे लागले होते. नंतर त्यांनी प्रेम हा विषय त्यांच्या आयुष्यातून कायमचा बंद केला. त्यानंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ टाटा व्यवसाय वाढवण्यामध्ये गुंतवला. तरीही होती रतन टाटा यांच्या प्रेमाची दुःखद कहानी.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *