रेखा यांच्या मांडीवर बसलेला हा चिमुकला आहे तरी कोण?

मुंबई | 80 ते 90 च्या दशकात बॉलीवूडवरती आपल्या सुंदर अदाकारांनी अनेकांना स्वतःकडे आकर्षित करणारी अदाकारा, अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा यांनी त्यांच्या काळात बॉलीवूडवर अधिराज्य गाजवलं. अशात त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये त्यांच्या मांडीवरती एक लहान मुलगा बसलेला दिसतो आहे. लहान मुलगा नेमका कोण आहे याचा अनेकजण शोध घेत आहेत. मात्र अजून खूप कमी लोकांना या लहान मुलाची ओळख पटू शकली आहे. या बातमीमधून फोटोत दिसत असलेला हा चिमुकला नेमका आहे तरी कोण हेच जाणून घेऊ.

नव्वदच्या दशकातला मोहबते हा चित्रपट तुम्ही सर्वांनी नक्कीच पाहिला असेल. शाहरुख खान बरोबरच या चित्रपटामध्ये असलेले इतर तीन प्रेमी युगल चांगलेच गाजले होते. त्यातीलच निळ्या डोळ्यांनी सर्वांच्या हृदयात आपलं स्थान पक्क करणारा अभिनेता जुगल हंसराज हा देखील तुमच्या लक्षात असेल. तर रेखा यांच्याबरोबर मांडीवर बसलेला हा चिमुकला जुगल हंसराजच आहे. जुगल लहानपणापासूनच खूप क्युट दिसत होता. मोहब्बते या चित्रपटामधून त्याने अनेक तरुणांच्या मनावरती स्वतःची छाप उमटवली.

साल २०१४ मध्ये त्याने जास्मिन ढिल्लनशी लग्न केले. बरेच वर्षे हे दोघे एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर जुगल आपल्या पत्नीबरोबर अमेरिकेमध्ये स्थायिक झाला आहे. बॉलीवूड आणि मनोरंजन विश्वापासून तो आता खूप दूर गेला आहे. लंडनमध्येच तो आपल्या कुटुंबाबरोबर सुखी आयुष्य जगत आहे.

मात्र या चॉकलेट बॉयने लहानपणापासूनच बॉलीवूडमध्ये स्वतःच पाऊल ठेवलं होतं. लहानपणी त्याने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्याची प्रसिद्धी खूप जास्त होती. लहानपणी जितका गोंडस आणि क्युट तो दिसत होता तितकाच मोठा झाल्यावर देखील तो हँडसम दिसत होता. त्यामुळेच त्याला चॉकलेट बॉय हा टॅग पडला. मासूम आणि कर्मा अशा चित्रपटांमधून त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *