“अप्पी आमची कलेक्टर” या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आहे तरी कोण?

मुंबई | झी मराठी ही वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे प्रयोग करत असते. यातील काही फसतात तर काही खूप गाजतात. या वाहिनीवर सत्यवान सावित्री ही मालिका सध्या सुरू आहे. मात्र या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळालेली नाही. त्यामुळे लवकरच ही मालिका बंद होणार आहे. अशात झी मराठी वाहिनीवर अजून अनेक मालिका बंद होणार आहेत. त्यांच्या जागी बरेच कार्यक्रम आणि मालिका येत आहेत. नुकताच बस बाई बस हा कार्यक्रम सुरू झाला.

यामध्ये महिला आणि त्यांना पडणारे अनोखे प्रश्न दिसत आहेत. तसेच डान्स महाराष्ट्र डान्स या शो आणि तू चाल पुढं तसेच नाव गाडी नवं राज्य ही मलिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकांची दमदार मेजवानी असलेल्या झी मराठी वाहिनीने आता यात आणखीन एका मालिकेची भर घातली आहे. या वाहिनीवर आता अप्पी आमची कलेक्टर ही आणखीन एक मालिका दाखल होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन आता दुप्पट वाढणार आहे.

या मालिकेचा नुकताच एक प्रोमो व्हिडिओ समोर आला. यामध्ये अपर्णा हे पात्र अभिनेत्री शिवानी नाईक साकारणार आहे. अपर्णा ही एका गरीब कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. ती खूप मेहनतीने कलेक्टर बनवते. तिचे बाबा एक रिक्षा चालक आहेत.

ते आपल्या मुलीला पाहून तिला सेल्युट करततात. त्यावेळी ती आपल्या बाबांना मी अजून तुमची अप्पीच आहे असे म्हणते. मालिकेचा प्रोमो पाहता ही मालिका प्रेखंकांचे खूप मनोरंजन करणार हे मात्र नक्की. मालिकेत मुख्य अभिनेत्रीची भूमिका शिवानी नाईक साकारणार आहे.

तिची ही पहिलीच मालिका आहे. या आधी तिने अनेक एकांकीकेमध्ये काम केले आहे. आपल्या नवीन मलिकेबद्दल एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, “मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय.

एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करून आपले ध्येय साध्य करणा-या मुलीची भूमिका मला करायला मिळणार आहे. मी खूप खुश आहे कारण मी एका महत्त्वकांक्षा असणाऱ्या मुलीची भूमिका करणार आहे आणि ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल.”

या मालिकेची निर्मिती श्वेता शिंदे करत आहे. या आधी तिने देव माणूस, देव माणूस २, लागीर झालं जी अशा प्रसिद्ध मालिकांची निर्मिती केली आहे. अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत लागीर झालं जी मधील समाधान मामा देखील आहेत. अभिनेते संतोष पाटील या मालिकेत वडिलांची भूमिका साकारणार आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *