देवाची ज्योत घेऊन येताना दोन भक्तांची प्राणज्योत मावळली

बीड | नवरात्र उत्सवाला देशभरात उधाण आलं आहे. अशातच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात एक दुर्घटना घडली आहे. तुळजापूरहून दोन बीड जिल्ह्यातील दुचाकीस्वार ज्योत घेऊन जात होते. अशातच अज्ञात वाहनाने धडक दिली यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोन तरुणांच्या मृत्यूमुळ गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बीड आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण याठिकाणी ही घटना घडली. महेश भास्करराव भोसले, अमोल सुरेशराव खिलारे अशी मृतांची नावे आहेत. दरवर्षीप्रमाणे गावात नवरात्र उत्सवानिमित्त तुळजापूर वरून ज्योत आणण्याची प्रथा आहे.

गावातील काही तरुण तसेच भक्त तुळजापूर येथून शनिवारी सकाळी निघाले होते. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दुचाकीला येरमाळा येथे दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात 5 ठार नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. रात्री 8 ते 9 च्या सुमारास नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर सोनारीफाटा करंजीजवळ ट्रक आणि आयशर या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 5 जन जागीच ठार झाले तर 5 जन जखमी झाले. जखमींना हिमायतनगर येथील रुग्णालयात दाखल केलं.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *