सलमानच्या बालपणीची भूमिका साकारणारा हा बाल कलाकार आता आहे तरी कुठे?…

मुंबई| अभिनय क्षेत्रात काम करत असताना मोठ मोठ्या अभिनेत्री आणि अभिनेते त्यांच्या कामामुळे प्रसिध्दी झोतात येतात. याच प्रमाणे काही बाल कलाकार देखील त्यांच्या अभिनयाची छाप प्रेकाकांमध्ये उमटवण्यास यशस्वी ठरतात. मात्र नंतर हे बाल कलाकार रुपेरी पडद्यावर दिसले नाही तर ते आता कुठे आहेत? काय करतात? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.

साल १९९७ मध्ये सलमानचा ‘जुडवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्या काळी या चित्रपटाने २४२.८ लिलियनची कमाई केली होती. हा चित्रपट इतका गाजला होता की, अनेकांना याचे वेड लागले होते. चित्रपटाच्या गाण्यांनी देखील प्रेक्षकांचे मन जिंकले होते. अशात या चित्रपटात एक बाल कलाकार देखील होता. त्याने सलमान खानच्या लहानपणीच रोल केला होता. हा चिमुकला देखील प्रेक्षकांची दाद मिळवण्यात समर्थ ठरला.

मात्र आता हा चिमुकला मोठा झाला आहे. तो आता नेमकं काय करतो, कसा दिसतो हे सर्व काही जाणून घेऊ. जुडवा या चित्रपटात सलमानच्या लहानपणीची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याचे नाव आहे ओमकार कपूर. ओमकार आता ३५ वर्षांचा झाला आहे. तसेच तो आता खूप हँडसम दिसतो. मात्र त्याने आता रुपेरी पडद्यापासून दूर जाणे पसंत केले आहे. आपल्या शिक्षणासाठी त्याने रुपेरी पडदा सोडला. त्यानंतर त्याने शिक्षण पूर्ण केले आणि पुन्हा एकदा तो मनोरंजन विश्वात रमला आहे. मात्र आता तो एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहतो. आता पर्यंत त्याने अहमद खान, फरान अख्तर, सजय लीला भन्साळी यांच्या बरोबर काम केले आहे.

पुढे देखील तो याच क्षेत्रात काम करणार आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात ‘मासूम’ या चित्रपटासोबत केली , जिथे त्याला बालकलाकार म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्या काळातील तो सर्वात आवडता बालकलाकार बनला होता. नंतर त्याला गोविंदा , अनिल कपूर , उर्मिला मातोंडकर , सलमान खान आणि श्रीदेवी यांसारख्या भारतीय चित्रपट उद्योगातील अनेक बड्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली.

त्याने जुदाई, आज का नन्हा फरिश्ता, एक अजुबा, प्यार का पंचनामा २ या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तसेच फिल्मी चक्कर आणि सियासत या मालिकेत देखील त्याने अभिनय केला आहे. प्यार का पंचनामा २ यातील कामासाठी त्याला एका पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *