पूर्ण कॉलेजमध्ये टॉप करूनही मुन्नाभाईमुळे दुसरा आलेला स्वामी आता आहे तरी कोठे? करतोय ‘हे’ काम

दिल्ली | राजकुमार हिरानी दिग्दर्शित मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट त्याकाळी भन्नाट गाजला होता. आजही या चित्रपटातील अनेक डायलॉग्स वरती मिम् बनवलेल्या पाहायला मिळतात. सर्किट आणि मुन्नाभाई या दोघांनी चित्रपटात धमाल उडवली होती. मात्र या चित्रपटातील प्रत्येकच कॅरेक्टर हे खूप हजरजबाबी होते. प्रत्येक कलाकाराने आपल्या पात्राला या चित्रपटांमध्ये पूर्णपणे न्याय दिला होता.

याच चित्रपटात संपूर्ण वर्गातून उठून “सर रूम चेंज करने के लिए कौनसा फॉर्म भरणा चाहिये ….?” हा प्रश्न विचारून स्वामीने वर्गात एकच हशा पिकवलेला दिसला. चित्रपटामध्ये स्वामी हे पात्र अभिनेता खुर्शीद लॉयरने साकारले आहे. चित्रपटामध्ये खुर्शीद अतिशय भित्रा, लाजाळू आणि खूप अभ्यासू दाखवला होता. मुन्ना बरोबर त्याला रूम शेअर करावी लागली होती. संपूर्ण कॉलेजमध्ये टॉप करून देखील तो दुसऱ्या क्रमांकावर आला होता. कारण मुन्नाने चिटिंग करून परीक्षा पास केली होती.

अशात हा स्वामी आता कुठे आहे तो नेमकं काय करतोय तसेच तो आता कसा दिसतो याविषयी माहिती जाणून घेऊ. स्वामी म्हणजेच अभिनेता खुर्शीद हा आता आधीपेक्षा कमालीचा वेगळा दिसतो. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटामध्ये तो अगदी बारीक शरीरयष्टी असलेला दिसत होता. मात्र आता त्याच्या वजनात वाढ झाली आहे. तसेच त्याचे वय देखील बरेच वाढलेले असून केस पांढरे झाले आहेत आणि डोक्यावर मोठे टक्कल देखील पडले आहे.

मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटामधून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात त्याने साकारलेली स्वामी ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटानंतर तो डबल धमाल आणि अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटांमध्ये देखील कमालीचा अभिनय करताना दिसला होता. मात्र नंतर बऱ्याच काळ तो सिने विश्वापासून दूर राहिला. या काळात तो सोशल मीडियावर देखील सक्रिय नव्हता.

तो नेमका कुठे आहे काय करतोय याविषयी कुणालाच काहीच माहिती नव्हते. अशात मोठ्या ब्रेक नंतर त्याने पुन्हा एकदा कम बॅक केले. त्यामुळे आता तो द ग्रेट इंडियन मर्डर या थ्रिलर वेब सिरीजमध्ये काम करत आहे. या वेब सिरीजमध्ये देखील त्याचा अभिनय कौतुकास्पद आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *