सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील दिग्गज अभिनेत्याचे निधन

मुंबई | लोकप्रिय मराठी टीव्ही मालिका सुख म्हणजे नक्की असतंमध्ये शालिनीच्या वडिलांची भूमिका साकारणारे अरविंद धनू यांचे निधन झाले आहे. अभिनेते 47 वर्षांचे होते. अरविंद धनू यांच्या अकाली निधनाने टीव्ही इंडस्ट्री हादरून गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद धनू यांनी सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमाला हजेरी लावली त्यानंतर त्यांचे निधन झाले.

समोर आलेल्या माहितनुसार कार्यक्रमात गेल्यावर त्यांना ह्रुदयात वेदना होत होत्या आणि उच्च रक्तदाब होता. त्यामुळे त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचेही म्हटले जात आहे.

सुख म्हंजे नक्की काय असतं या टीव्ही मालिकेचे स्टार म्हणून अरविंद मोठ्या प्रसिध्दी झोतात आले होते. त्यांनी राजकारणी आणि माधवी निमकर यांच्या वडिलांची ऑन-स्क्रीन भूमिका साकारली. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि अभिनय क्षमतेचे सर्वांनी कौतुक केले.

अरविंद धनू यांनी यापूर्वी अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत. लेक माझी लाडकी, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि क्राईम पेट्रोल या टीव्ही शोमध्ये ते दिसले होते. एक होता वाल्या या मराठी चित्रपटातही त्यांनी दमदार अभिनय केला.

मनोरंजन विश्वात सतत कलाकारांचे मृत्यू होत आहेत. काही दिवसांपूर्वीच दीपेश भान यांचे निधन झाले होते. अशात आता अरविंद धनू यांच्या निधनाने पुन्हा एकदा सिनेविश्व हादरून गेले आहे. सर्व चाहते सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *