तुमच्या आवडत्या कलाकारांची मुलं नेमकी काय करतायेत? अभिनय नाहीतर ‘या’ क्षेत्रात आहेत कार्यरत

मुंबई | सिने विश्वातील कलाकार त्यांच्या अभिनया बरोबर त्यांच्या वयक्तिक आयुषयमुळे देखील चर्चेत असतात. अशात त्यांची मुलं नेमकी काय करतात. काय शिकतात. कुठे काम करतात हे जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडते. त्यामुळे या बातमीतून मराठी सिनेसृष्टीतील कलकरांची मुलं नेमक काय करत आहेत हे जाणून घेऊ.

अलका कुबल
अलका कुबल यांनी मराठी चित्रपट सृष्टीत मोठी कामगिरी केली आहे. यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी ही एक वैमानिक आहे. तिला वैमानिकच लाईफटाईम लायन्सस मिळाले आहे. सध्या ती मियामी फ्लोरिडा येथे राहते. तसेच अलका यांची दुसरी मुलगी एमबीबीएस शिकत आहे. तिला त्वचाशास्त्रज्ञ बनायचं आहे.

अशोक सराफ
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या मुलाचे नाव अनिकेत सराफ असं आहे. अनिकेत सिने विश्व पासून दूर आहे. त्याला लहानपणापासूनच शेफ व्हायचं होतं. जेवण बनवण्यात त्याला फार रस आहे. त्यामुळे त्याने हे क्षेत्र निवडलं. त्याच्या शिक्षण देखील फ्रान्समध्ये झाला आहे. तो एक युट्युबर देखील आहे. युट्युबवर त्याल निक सराफ या नावाने ओळखतात.

नागेश भोसले
नागेश भोसले यांनी मराठी सिनेसृष्टीत छोटा आणि मोठा पडदा दमदार गाजवला आहे. त्यांच्या मुलीचे नाव कुहू असे आहे. ती देखील एक फिटनेस ट्रेनर आहे. तसेच ती एक उत्तम खेळाडू देखील आहे. एमचर ओलंपिकमध्ये तिने कांस्यपदकावर गवसणी घातली आहे.

अरुण कदम
अरुण कदम यांनी आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत त्यांच्या विनोदाने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. त्यांच्या मुलीचे नाव सुकन्या असे आहे. सुकन्या अभिनयापासून बरीच दूर आहे. ती एक ग्राफिक डिझायनर म्हणून काम करते.

संजय जाधव
मराठी चित्रपट सृष्टी मध्ये सध्या संजय जाधव हा दिग्दर्शक खूप गाजत आहे. संजय यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवरती चित्रपट बनवले आहेत. त्यांच्या मुलीचे नाव ध्रीती जाधव असे आहे. ती एक उत्तम डान्सर आहे. तसेच तिला शेफ व्हायचे आहे ज्यासाठी ती सध्या शिक्षण घेत आहे.

शरद पोंक्षे
शरद पोंक्षे यांना दोन मुली आहेत. स्नेहा आणि सिद्धी अशी त्यांच्या दोन मुलींची नावे आहेत. नुकतीच त्यांची मुलगी परदेशात वैमानिक होण्यासाठी गेली आहे. सिद्धीला लहानपणापासूनच वैमानिक व्हायचं होते. शरद यांची दुसरी मुलगी स्नेहा हिने नुकतेच मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. धर्मवीर या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी तिने हातभार लावला आहे.

मिलिंद गवळी
आई कुठे काय करते या मालिकेमधून मिलिंद गवळी सध्या मोठे चर्चेत आहेत. त्यांना एक मुलगी आहे . मिथिला गवळी असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी मी तिला चे लग्न झाले असून ती देखील मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. तसेच ती एक फिटनेस ट्रेनर म्हणून देखील काम करते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *