जळगावात पुन्हा सैराट! भावाने बहीण आणि प्रियकराची केली हत्या; जळगाव हादरलं

जळगाव | प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये फक्त आणि फक्त प्रेमाचीच भावना असते. आपल्या प्रेमामधून त्यांना कुणालाही त्रास द्यायचा नसतो. मात्र सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती करणारा एक प्रकार जळगावात घडला आहे. एका अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केली आहे.

ही घटना जळगाव येथे रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी घडली. चोपडा परिसरात अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीचा गळा चिरला. तसेच बहिणीच्या प्रियकराची गोळी झाडून हत्या केली. त्यानंतर हा अल्पवयीन मुलगा स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला.

बहिणीच्या प्रेमप्रकरणाला माझा विरोध होता, असे सांगत त्याने आणखीन चार जणांची नावे सांगितली आहेत. या चौघांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

12 ऑगस्टला रात्रीच्या वेळी अंधारात हा घातपात झाला. आपल्याबरोबर पुढे असे काही होईल हे या प्रेमी युगुलाला अजिबात माहित नव्हते. रक्षाबंधनाचा कार्यक्रम छान पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला भाऊ आपला आणि आपल्या प्रियकराचा जीव घेईल याची त्या वेड्या बहिणीला काहीच कल्पना नव्हती.

बहिणीची आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर हा अल्पवयीन मुलगा जेव्हा पोलिसांकडे आला तेव्हा पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृत मुलाचे आणि मुलीचे शव ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *