Video – वनिता खरातची भन्नाट जादू पाहून तुम्हीही व्हाल चकित

मुंबई | विनोदी अभिनेत्री वनिता खरात ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिच्या विनोदी अभिनयाने तिने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं आहे. तिच्या विनोदाचे अनेक चाहते आहेत. वनिताची शरीरयष्टी थोडी स्थूल आहे. मात्र तरी देखील तिने सुंदर त्याची एक नवी परिभाषा सर्वांना सांगितली.

काही काळापूर्वी तिने एक न्यूड फोटोशूट केलं होतं. यावेळी तिने असं म्हटलं होतं की, “मी माझ्या शरीरावर खूप प्रेम करते. माझ शरीर मला खूप आवडतं.” त्यावेळी अभिनेत्रीला काहींनी ट्रोल केलं होतं. तर बऱ्याच जणांनी तिच्या सुंदरतेच कौतुकही केलं होतं. अशात वनिताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. यामध्ये ती एक अनोखी जादू करताना दिसत आहे.

वनिता किती सुंदर अभिनय करते हे आपण सर्वांनी पाहिलंच आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाबरोबरच तिला बॉलीवूडमध्ये देखील अभिनय करण्याची संधी मिळाली. कबीर सिंग या चित्रपटामध्ये तिने अगदी छोटासा रोड निभावला होता. यामध्ये तिने मोलकरणीचं काम केलं होतं. अगदी काही मिनिटांच्या या भूमिकेमधूनच ती बॉलिवूडमध्ये देखील हिट ठरली. आषाढी या अभिनेत्रीने आता एक नवीन जादू केल्याने सगळेजण तिच्यावर हसतही आहेत आणि तिचं कौतुकही करत आहेत.

महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये प्रसाद खांडेकर हा अभिनेता देखील सर्वांचे मनोरंजन करतो. त्याचा अभिनय देखील वाखण्याजोग आहे. वनिताच्या जादूचा त्याने व्हिडिओ शूट केला आहे. तसेच वनिताची ही जादू त्यानेच सर्वप्रथम पाहिली. त्याने हाच व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम पेज वरती पोस्ट केला आहे.

व्हिडिओ पाहून तुम्ही पोट दुखेपर्यंत हसाल. कारण यामध्ये वनिताची जादू म्हणजे तिची झोप आहे. वनिताने सेट वरती एक डूलकी घेतली आहे. प्रसादने तिचा हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिला आहे की, “जादू चा व्हिडीओ” हा व्हिडीओ ऑन केला की तुम्ही 2 काऊंट मोजा आणि वने sssssss’ अशी जोरात हाक मारा मग जादू होईल वनी तुमच्याकडे बघेल मग तिला बर्थडे wish करा. आज आमच्या वनी चा बबड्या चा बड्डे आहे. ”

प्रसादने वनिताच्या वाढदिवसानिमित्त तिचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे तसेच तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. वनिताचे कौतुक करताना पुढे त्याने लिहिले आहे की, ” आमच्या सेट वरील सगळ्यांची लाडकी सगळ्यांकडे हक्काने हट्ट करून स्वतःचे लाड पूरवून घेणारी वनी…

७७६ वने तुला आयुष्यात जे जे हवं ते ते सगळं तुला मिळो आणि आता आहेस तशीच हसत, खेळत आणि बागडत राहा….बाकी दाद आहेच लव यू वणे….” 19 जुलै रोजी वनिता तिचा वाढदिवस साजरा करते. प्रसादने शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हसत हसत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

 

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *