ज्येष्ठ अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चित्रपट सृष्टी पुन्हा हादरली

दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज अभिनेत्यांवर काळ घाला घालत आहे. लता मंगेशकर, रमेश देव, बप्पी लहिरी अशा दिग्गज लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुःखातून चाहते सावरत होते.
आत्ता पुन्हा एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका दिग्गज अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यामुळे लाखो करोडो चाहते पुन्हा दुःखात पडले आहेत.

कोट्टायम प्रदीप असे या दिग्गज अभिनेत्याचे नाव आहे. ते मल्याळम सिने सृष्टीत काम करत होते. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीला एक मोठा धक्का बसला आहे.

2001 साली त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकले, त्यानंतर त्यांचे काही चित्रपट हिट झाले आणि ते मोठ्या पडद्यावर झळकू लागले. मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत त्यांचे मोठं नाव होते. त्यांना ज्येत्यांना ज्येष्ठ अभिनेते म्हणून देखील ओळखले जायचे.

 

त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. गुरुवारी पहाटे त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती जास्त बिघडली आणि हृदयविकाराचा झटका आला. यात ते वाचू शकले नाहीत.

 

त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेक दिग्गज लोकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांचे लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ७०हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आह

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *