खूपच गोड! बाबांच्या खांद्यावर बसलेली ही चिमुकली आज गाजवत आहे बॉलिवूड

मुंबई | सोशल मीडियावर नेहमीच कलाकार आणि त्यांचे बालपणीचे फोटो हा एक मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे. अनेक चाहते आपल्या आवडत्या कलाकाराच्या बालपणीच्या फोटोमध्ये खूप रमतात. त्यांना कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहायला खूप आवडते. कारण यामध्ये नेहमीच मजेशीर चॅलेंज सुरू असते. अनेक जण फोटो ओळखून दाखवण्याचे चॅलेंज स्वीकारत असतात. मात्र यातील खूप कमी व्यक्ती यात जिंकतात.

अशात आता सोशल मीडियावर एका छोट्या मुलीचा फोटो खूप चर्चेत आला आहे. यामध्ये ही चिमुकली तिच्या बाबांच्या खांद्यावर बसून मस्त आनंद घेत आहे. यात तिचे बाबा मोठी स्माईली देताना दिसत आहेत. तर तिने यात डेनियमचा एक सुंदर फ्रॉक घातला आहे. एकदम गोरी आणि गुबगुबीत गाल असलेली ही सुंदर चिमुकली आज बॉलीवूडवर राज्य करत आहे. आता या अभिनेत्रीला कदाचित अनेकांनी ओळखलं असेल. कारण तिची ओळख तिच्या बाबांमुळे लगेच समजत आहे.

फोटोत अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आहेत. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर विराजमान झालेली चिमुकली म्हणजे त्यांची कन्या सोनाक्षी सिन्हा आहे. दबंग या पहिल्याच चित्रपटातून सोनाक्षी खूप प्रसिद्ध झाली. तिची फिगर आणि तिच्या सौंदर्याने तिने सगळ्यांना भुरळ घातली. या चित्रपटात तिने सलमान खान बरोबर स्क्रीन शेअर केली होती. तसेच यातील तिची डायलॉग फेकण्याची पद्धत प्रेक्षकांना खूप आवडली.

सोनाक्षीने आजवर बॉलीवुडच्या सुपर स्टार बरोबर अभिनय केला आहे. सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, शाहिद कपूर यांच्या बरोबर तिने दमदार आणि प्रसिद्ध चित्रपट केले आहेत. तिला अभिनया बरोबरच डान्सची देखील खूप आवड आहे. आपल्या डान्सची झलक ती नेहमीच चाहत्यांना दाखवत आली आहे. तिचा रावडी राठोड या चित्रपट देखील खूप गाजला. यात तिने अक्षय कुमार बरोबर अभिनय केला होता. यामध्ये अक्षय बरोबरच सोनाक्षीने देखील तिचा रावडी अंदाज दाखवत अनेकणांची बोलती बंद केली होती.

तिचा बेटिया हा म्युजिक व्हिडिओ देखील खूप हिट ठरला. अशात लवकरच ती कुकडा या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यासह तिच्याकडे आणखीन दोन चित्रपट आहेत. यातील एका चित्रपटाचे नाव डबल एक्सएल असे आहे. यात सोनाक्षी पुन्हा एकदा आव्हानात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच निकिता रॉय अँड द बुक ऑफ डार्कनेस हा देखील तिचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या सर्व चित्रपटांच्या शुटींगमध्ये ती व्यस्त आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *