वैभव मांगले यांनी प्रेक्षकांना दिली अतिशय दुःखद बातमी.

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक अभिनेते आहेत की, ज्यांच्या भूमिकेमुळे ते लोकप्रिय ठरतात. यामध्ये अभिनेते वैभव मांगले यांचे नाव देखील आपल्याला आग्रह क्रमाने घेता येईल. वैभव मांगले यांनी अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये आपल्या भूमिकांनी सर्वांची मने जिंकले आहेत.

 

वैभव मांगले यांनी टाईमपास या चित्रपटात अफलातून भूमिका साकारून सगळ्यांचे मन जिंकली होती. या चित्रपटात वैभव मांगले यांनी शाकाल ही भूमिका साकारली होती. त्यांना दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब हा शाकाल म्हणत असतो. या चित्रपटातील त्यांचा ‘नया है वह’ हा डायलॉग प्रचंड गाजला होता. त्यानंतर त्यांचा हा डायलॉग अनेकांनी आपल्या चित्रपटासाठी ही वापरल्याचे पाहायला मिळाले.

वैभव मांगले यांनी अनेक मालिका चित्रपट नाटकांमध्ये काम केले आहे. मात्र, त्यांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण भूमिका या कायमच लोकप्रिय राहिलेल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शेर शिवराज या चित्रपटात देखील त्यांनी अतिशय लोकप्रिय अशी भूमिका साकारली होती. शेर शिवराज चित्रपटात त्यांनी साकारलेली गंगाधरराव पंत ही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना आजही पहावीशी वाटते. त्यांच्या याच अफलातून टाइमिंगने प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील असल्याचे बोलले जाते. वैभव मांगले हे आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे ते सामाजिक कार्यात देखील तेवढेच अग्रेसर असतात.

अनेकदा सामाजिक संघटनांसोबत मिळून ते काही उपक्रम राबवताना देखील दिसत असतात. आता वैभव मांगले हे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे वैभव मांगले यांनी एका आपल्या लोकप्रिय नाटकातील भूमिका सोडली असल्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. वैभव मांगले हे अलबत्या गलबत्या या नाटकामध्ये चेटकिणीची भूमिका साकारत होते.

 

त्यांनी साकारलेली चेटकिणीची भूमिका हे प्रचंड लोकप्रिय झाली होती. रत्नाकर मतकरी यांचे हे नाटक होते. सुरुवातीला दिलीप प्रभावळकर यांनी ही चेटकिणीची भूमिका गाजवली. मात्र, नंतर चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले. यामध्ये त्यांनी वैभव मांगले यांना चिटकिणीच्या भूमिकेसाठी भूमिका दिली. त्यांनी ती लोकप्रिय देखील करून दाखवली.
मात्र, आता सध्या या नाटकाचा प्रोमो आणि पोस्टर फिरत आहेत. यामध्ये वैभव मांगले यांच्यासारख्याच दिसणारे एक अभिनेते आहेत. ते आता चिटकिणीची भूमिका साकारत आहेत. त्यावर खुलासा करताना वैभव मांगले यांनी सांगितले की, मी आता हे नाटक सोडले आहे. आपण मी या नाटकात आहे, असे समजून जात असाल तर आपला भ्रमनिरास होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *