दुर्दैवी! ३०० फूट खोल दरीत चारचाकी कोसळली, मृतदेहांचा खच पडला, अन् पुढे जे घडलं ते पाहून डोळ्यात पाणी येईल

शिमला ‌| मुलगी बाळांत झाली त्यामुळे तिच्या कुटुंबातील आठ व्यक्ती तिला भेटण्यासाठी तिच्या सासरी निघाले होते. हे ८ जण दोन वेगवेगळ्या जीपमधून चालले होते. यातील ५ जण एका गाडीत होते. तर सुसऱ्या गाडीत ३ जण होते. मुलीला बाळ झालं त्यामुळे तिचे नातेवाईक तिला भेटला जात होते. मात्र त्या बाळाला भेटायला जाताना रस्त्यात त्यांच्यावर काळ आघात करेल याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

सर्व जण खूप आनंदात चालले होते. मात्र मध्येच त्यांची ५ व्यक्ती बसलेली कार तब्बल ३०० फूट खोल असलेल्या दरीत कोसळली. एका क्षणात कुटुंबीयांच्या आनंदाला विरजण लागलं आणि होत्याचं नव्हतं झालं. दुसऱ्या कारमध्ये बसलेल्या व्यक्तींनी हा सर्व थरार पाहिला. त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेमुळे कुटुंबीय पूर्णतः शोकाकुल वातावरणात बुडाले आहे.

सदर घटना हिमाचल येथील शिमला जिल्ह्यात घडली आहे. कार ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने यात जागीच ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. ही सर्व मंडळी पुलबहाळ या गावातून ग्रामपंचायत देइच्या चेलराना गावाकडे जात होती. नेवतीजवळील हमलती या दरीत ही कार कोसळली आहे. यात एकूण ५ व्यक्ती प्रवास करत होते.

मारुती या कारमध्ये ३ व्यक्ती प्रवास करत होत्या तर बेलेरो जीपमध्ये ५ व्यक्ती प्रवास करत होत्या. ज्यावेळी कार ३०० फूट खोल दरीत कोसळली तेव्हा मारुती कार मधील तीन व्यक्तींनी ही घटना पाहिली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की, समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवत असताना जीप मधील कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती इतर कुठेही न जाता थेट दरीत कोसळली.

यातील एका महिलेचा मृतदेह सुमारे ८०० मीटर दरीत वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. यातील एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावरती आयजीएमसी शिमला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तीन जण जागीच मृत्युमुखी पडले आहेत. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत आहे. कारण ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे तो भाग अतिदुर्गम आहे. वाहन थांबून अर्धा किलोमीटर लांब पायी चालत आल्यानंतर घटनास्थळी पोहोचता येत आहे. सदर घटनेने संपूर्ण कुटुंबीय आणि परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *