उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांची अधुरी प्रेम कहाणी..

 

मुंबई – दिवंगत अभिनेते दादा कोंडके जर आज आपल्यात असते तर आज त्यांचा 85 वा वाढदिवस त्यांनी साजरा केला असता. दादा कोंडके केवळ अभिनेतेच नाही तर चित्रपट निर्मातेही होते. सत्तरीचा आणि ऐशींच्या दशकात त्यांचे मराठी सिनेमे तुफान गाजले आणि ते त्याकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. त्यांच्या चित्रपटात हमखास मिळणारा एक चेहरा होता तो म्हणजे, उषा चव्हाण.
दादा कोंडके यांच्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या उषा आज चित्रपटांपासून दूर आहेत. दादा कोंडके यांच्या त्या आवडत्या अभिनेत्री होत्या इतकेच नाही तर दादा कोंडके यांना उषा यांच्याशी लग्नही करायचे होते. पण उषा यांनी यांस नकार दिल्यानंतर सूड घेण्यासाठी बायोग्राफीमध्ये उषा यांच्याविषयी अनेक वाईट गोष्टी लिहील्या. उषा यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा 6 ते 7 वर्षांपूर्वी त्यांच्या ब्लॉगवर केला आहे.

 

दादा कोंडके यांना त्यांच्या ‘सोंगाड्या’ या चित्रपटासाठी अभिनेत्रीची गरज होती. त्यावेळी सातारा बसस्थानकाजवळ दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची पहिली भेट झाली होती. तेव्हा दादांनी उषा यांची निवड केली आणि त्यांना पहिला ब्रेक मिळाला. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता, असे उषा म्हणतात.

 

अभिनेत्री उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांनी अनेक चित्रपटात सोबत काम केले होते. यादरम्यान दादा कोंडकेंनी उषा यांच्याजवळ लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती पण उषा यांनी नकार दिल्यावर दादा कोंडके यांनी ‘एकटा जीव’ या पुस्तकात त्यांच्याबद्दल बरेवाईट छापले होते, असे उषा चव्हाण यांनी सांगितलं.

 

दादा कोंडके यांच्या संपत्तीवरही हक्क गाजवण्याचा आरोप उषा यांच्यावर करण्यात आला होता. पण खुद्द दादा यांनी त्यांच्या खडकवासला येथील स्टुडिओच्या पाच ट्रस्टीपैकी एक म्हणून उषा चव्हाण यांचे नाव मृत्यूपत्रात लिहीले होते. पण दादांच्या कुटुंबाकडून त्यांना फार मनस्ताप सहन करावा लागला असे उषा यांनी सांगितलं.

 

उषा आणि दादांच्यात होता 23 वर्षांचा गॅप:
उषा चव्हाण आणि दादा कोंडके यांच्या वयामध्ये जवळपास 23-24 वर्षाचे अंतर होते तरीही प्रेक्षकांनी दोघांची जोडी डोक्यावर घेतली होती. उषा चव्हाण केवळ अभिनेत्रीच नाही तर मराठी चित्रपटसृष्टीत उत्तम नृत्यांगनाही होत्या. त्यांनी मराठी चित्रपटात अनेक उत्तम डान्स परफॉर्मन्स दिले होते. विशेष म्हणजे उषा चव्हाण ह्या अभिनेत्री जयश्री गडकर यांच्या अनेक लावणींमध्ये बॅकस्टेज डान्सर म्हणून काम केले आहे. अभिनय, सौंदर्य आणि नृत्य या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे अढळ असे स्थान निर्माण केले.

 

उषा चव्हाण यांचे सिनेमे:
अभिनेत्री उषा चव्हाण यांचा आज वाढदिवस. दादा कोंडकेंसोबत एकेकाळी मराठी सिनेमा गाजवणारी ही अभिनेत्री आज ६७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘सोंगाड्या’, ‘पांडू हवालदार’, ‘पळवा पळवी’, ‘गनिमी कावा’ असे विविध चित्रपट उषा यांनी मराठी प्रेक्षकांना दिले. दादा कोंडकेंसोबत त्यांनी जोडीने प्रेक्षकांना खळखळून हसवले. पण या जोडीमध्ये कटूताही आली होती.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *