पांढुरंगाच्या नगरीत दोन मजुरांचा दुर्दैवी अंत; रेल्वे…

पंढरपूर |  पंढरपूरमध्ये 03 ऑगस्ट रोजी रेल्वे रुळावर परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला आहे. हा एक अपघाती मृत्यू असून छत्तीसगड येथील मजुरांना रेल्वे रुळावर चिरडले गेले आहे.

या घटनेत दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. रेल्वे अपघात असल्याने यात दोन व्यक्ती एवढ्या चिरडल्या गेल्या की, त्यांचे धड शिरापासून वेगळे पडेल. सदर घटना रात्रीच्या सुमारास घडली. त्यामुळे रात्री याची माहिती कुणालाच नव्हती. सकाळी प्रवाशी निघालेले असताना हा प्रकार पाहिला तेव्हा तिथे बग्यांची मोठी गर्दी झाली होती.

हा अपघात जिथे झाला तिथे लगेचच सकाळी पोलीस पोहचले. त्यावेळी तिथे दारूच्या काही बाटल्या आणि काचा सोडल्या. अवैध्यरीत्या दारू विकणे आणि नशा करणे यामुळे हा अपघात झाला असल्याचे समजते. सदर व्यक्ती या मद्यधुंद अवस्थेत रेल्वे रुळावर दारू पीत होत्या. तेव्हाच एक ट्रेन त्यांच्या दिशेने आली. त्यावेळी मद्यधुंद असल्यामुळे त्यांना काही समजले नाही. यातच या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

रेल्वे रुळावर नेहमीच अपघात होत असतात. रेल्वेचा वेग खूप असल्याने प्रवास करताना देखील रेल्वे प्रवासाच्या सूचना नेहमी सांगितल्या जातात. मात्र अशा पद्धतीने दारू पिऊन जर रुळावर कोणी असेल तर यात आपला जीव जाणार हे नक्की असते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *