‘तू चाल पुढं’ मालिका अडचणीत; प्रेक्षकांनी केलं भलतचं ट्रोल

मुंबई | मराठीत मनोरंजन विश्वात अनेक मालिका येत जात असतात. या मालीक कधी खूप गाजतात तर कथेत बदल झाल्याने त्या चांगल्याच पडतात. अशात मालिका विश्वात मालिका सुरू होण्या आधीच तिच्यावर टीका होत असेल तर. ही बाब खरोखर गंभीर आहे. मालिका सुरू होण्याआधीच तिच्यावर टीका होणे म्हणजे मालिका सुरू झाल्यानंतर ती कोण पाहणार असा प्रश्न उभा राहतो. सध्या मालिका विश्वात नवीन मालिकांचा सुळसुळाट पाहायला मिळतो आहे.

अनेक नवीन मालिका दुसऱ्या जुन्या मालिकेची जागा घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. यामध्ये जेव्हा मालिकेचा प्रोमो व्हिडिओ समोर येतो तेव्हा त्यात मालिकेची वेळ दिली असल्यास. प्रेक्षक लगेचच अंदाज बांधतात की आता नेमकी कोणती मालिका बंद होणार आहे. अशा झी मराठी वरती एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “तू चाल पुढ” असे या मालिकेचे नाव आहे. मालिकेचा प्रोमो व्हिडिओ देखील नुकताच प्रदर्शित झाला आहे.

हा प्रोमो पाहून चाहत्यांनी यावर तुफान टीका केली आहे. यामध्ये असलेली कथा ही कॉपी केल्याचं म्हटल जात आहे. त्यामुळे मालिका सुरू होण्याआधी तिच्यावर मोठे मिम व्हायरल होत आहेत. मालिकेच्या कथानकावर तुफान चर्चा रंगली आहे. अनेक जण यावर वेगवेगळ्या टीका करत आहेत.

या मालिकेत दिपा परब ही अभिनेत्री मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच तुझ्यात जीव रंगला मधील राणा दाची वहिनिसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर ही यात खलनायिकेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मुख्य अभिनेत्री असलेली दिपाहीने नुकतीच या मालिकेविषयी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी ती म्हणाली होती की, ” बऱ्याच काळानंतर मराठी दैनंदिन मालिका करताना स्वतःच्या घरी परतल्याची भावना आहे. ‘तू चाल पुढं’ या मालिकेचं कथानक अतिशय सुंदर असून कथा अश्विनी या गृहिणीभोवती फिरते. आपल्या कुटुंबासाठी ती काय करते हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळेल. बऱ्याच कालावधीनंतर मराठी मालिका करतेय, त्यामुळे प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा भरभरून मिळेल अशी मी आशा करते.

या मालिकेतील अश्विनी ही प्रत्येक गृहिणीला आपलीशी वाटेल आणि आपल्यातलीच एक कोणीतरी छोट्या पडद्यावर आपलं नेतृत्व करतेय व त्याचसह आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरित करतेय हे त्यांना जाणवेल, अशी मला खात्री आहे.”

रिलीज झालेला प्रोमो व्हिडिओमध्ये एका गृहिणीच्या अवतीभवती संपूर्ण मालिका चालत असल्याचे दिसत आहे. ही गृहिणी घरातील सर्व व्यक्तींची मने जिंकते. तसेच गृहिणी असल्यामुळे घर खर्चामध्ये मदत करू शकली नाही तरी घर खर्च वाचवण्याचा मात्र ती प्रयत्न करते.

अतिशय गरीब साधी भोळी अशी तिची व्यक्ती रेखा आहे. मात्र या सर्वांमुळे आई कुठे काय करते मधील अरुंधती बरोबर तिची तुलना केली जात आहे. एका युजरने मिम बनवत लिहिलं आहे की, “आली पुन्हा एक रडूंदती” अनेक जण या मालिकेला इतर मालिकांची कॉपी केल्याचे म्हणत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *