दुःखद : कला विश्वावर पसरली शोक कळा,प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन.

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. तब्येत खालावल्याने त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची वार्ता आहे. मागील 15 दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते, तसेच दहा दिवसांपासून आयसीयूत त्यांच्यावर उपचार चालू होते. विक्रम गोखले यांच्या जाण्याने कलाक्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून दिग्गज अभिनेत्याला अनेक क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली जात आहे.

 

 

विक्रम गोखले (vikram gokhale) यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड, मराठी सिमेमांना अनेका भूमिका गाजवल्या आहेत. व्यासंगी अभिनेते म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक चित्रटात त्यांनी मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मात्र, घशाच्या त्रासामुळे त्यांनी अभिनयातून संन्यास घेतला होता

 

विक्रम गोखले यांना 2013 साली प्रदर्शित झालेल्या अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.(veteran actor vikram gokhale passed away)

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *