दुःखद : कला विश्वावर पसरली शोककळा प्रसिद्ध अभिनेत्याचे झाले निधन

दिल्ली | दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू वर मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे. कारण त्याच्या बडीलांचे निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या निधनाने पूर्ण साऊथ चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. महेश बाबू यांचे वडील कृष्णा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी देखील ते वाचू शकले नाहीत. अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. महेश बाबू यांचे वडील देखील एकेकाळी सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. मागील काही दिवसांपूर्वी महेश बाबू यांच्या आईचे निधन झाले होते. त्या दुःखातून महेश बाबू सावरण्याच्या अगोदरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.

महेश बाबू यांच्या वडिलांनी 350 हून अधिक चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यांच्या काळी ते चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवत होते. त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत त्यांचं मोठ नाव होते.

मात्र त्यांच्या अचानक जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि यातच त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर अनेक दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *