आमच्या अप्सराच्या लग्नाला यायचं हं, सोनाली कुलकर्णी चडणार बोहल्यावर…..!

नाशिक | आपल्या आवडत्या कलाकाराच्या आयुष्यातील सर्व गोष्टी चाहत्यांना माहीत करून घ्यायच्या असतात. मग यात अगदी त्या कलाकाराच्या लग्नातील धामधूम देखील चाहत्यांना पाहायची असते. अशात मराठी चित्रपट सृष्टीची ‘ अप्सरा ‘ सोनाली कुलकर्णीने खूप कमी लोकांच्या उपस्थित लग्न उरकले होते. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा लग्न करत आहे. आता जर तुम्ही सिनालीचे खरे फॅन असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.

कारण आता तुम्हाला सोनालीच्या लग्नाला हजेरी लावता येणार आहे. आता ते बरं कसं, कधी आणि कुठे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ. सोनाली कुलकर्णीने कुणाला बेनोडेकर बरोबर यूकेला लग्न केले. यावेळी लॉकडाऊन होता. त्यामुळे खूप सध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. त्यावेळी खूप कमी व्यक्ती लग्नात उपस्थित होत्या. तसेच सोनालीने आपल्या लग्नाचा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता.

त्यामुळे चाहते फार नाराज होते. मात्र चाहत्यांची ही नाराजी आता दुपटीने कमी होणार आहे. कारण सोनालीचा विवाह सोहळा याची देही याची डोळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. यावेळी तुम्ही सगळे तिच्या लग्नाला हजर राहू शकणार आहात. तिचं हे लग्न प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रसारित होणार आहे. पहिल्यांदाच कोणत्या तरी मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात असे घडत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना आता मोठा आनंद झाला आहे.

अभिनेत्रीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत सगळ्यांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे. सोनालीने लग्न तिचे वर्हाडी, ती लग्नात काय परिधान करणार, जेवणात काय मेनू असेल, डान्स, धमाल आणि डिजे या सर्वच गोष्टींची मजा चाहत्यांना प्लॅनेट मराठी ओटीटी मधून घेता येणार आहे. तिने तिची लग्न पत्रिका देखील तयार केली आहे. तर मग आता तुम्ही देखील या लग्नाला जाण्याची तयारी करा.

अभिनेत्रीने आपल्या लग्ना विषयी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, “प्लॅनेट मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नाचे प्रक्षेपण केले जात आहे. ज्यांना माझ्या लग्नाला हजर राहत आले नाही त्यांना आणि या जगभरात असलेल्या माझ्या सर्व चाहत्यांना माझ्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण अनुभवता येणार आहे. प्लॅनेट मराठी ओटीटी माझ्या चाहत्यांपर्यंत माझे लग्न पोहोचवत आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप सुखद आणि आनंददायी आहे.”

हा विवाह सोहळा खूप अनोखा असणार आहे. कारण पहिल्यांदा एक मराठी अभिनेत्री अशा पद्धतीने लग्न करत आहे. त्यामुळे सदर लग्न सोहळा प्लॅनेट मराठी ओटीटीवर ११ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित केला गेला आहे. काय मग तुम्ही पण येणार ना अप्सराच्या लग्नाला….?

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *