कर्करोगावर मात करत वाघ आला परत, महेश मांजरेकरांच ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झालेत चकित

मुंबई | मराठी सिने सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना गेल्या वर्षी कर्करोगाचे निदान झाले होते. अशात या संपूर्ण परिस्थितीवर त्यांनी मात करून नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. कर्करोग हा एक असा रोग आहे ज्यामधून क्वचितच काही व्यक्ती बचावतात. मात्र महेश मांजरेकर यांनी मोठ्या जिद्दीने या रोगावरती मात केली आहे. नुकताच त्यांचा ट्रान्सफॉर्मेशनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा फोटो पाहून सर्वजण त्यांचं कौतुक करत आहेत.

बिग बॉस २ मध्ये गायिका नेहा शितोळे ही सहभागी झाली होती. अशात नुकताच दे धक्का २ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. महेश मांजरेकर दिग्दर्शक चित्रपटात नेहाला संगीत लेखनाची संधी मिळाली आहे. यावेळी नेहाने महेश मांजरेकर यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये महेश मांजरेकर यांच ट्रान्सफॉर्मेशन दिसत आहे.

साल 2021 मध्ये त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाल्याच समजलं होतं. यावेळी मुंबईतील
एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते आपल्याला बिग बॉस ३ मध्ये दिसले होते. आजारपणातून नुकतेच बरे होत असताना त्यांनी या शोचे सूत्रसंचालन केले. अशात आता त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. अनेक जण त्यांना सोशल मीडियावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

तसेच शायऱ्या देखील पाठवत आहेत. “ठोकर खा कर गिरना फिर खुद को खुद ही संभालना फिर दोबारा से चलना यही संघर्ष है यही जीवन का सत्य है”, ही शायरी त्यांच्या एका चाहत्याने लिहिली आहे. “सर तुम्ही खरंच आम्हाला प्रेरणा दिलीत”, असं एका युजरने लिहिलं. तर एकाने ‘वाघ परतलाय’ अशी घोषणा केली. तर आणखीन एकाने ‘सर सॉलिड दिसत आहात. अब आयेगा बिग बॉस मराठी 4 मे मजा.’ असं म्हटल आहे.

महेश मांजरेकर यांच्यावरती शस्त्रक्रिया झाल्यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान त्यांनी बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनच होस्टिंग केलं. या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले की, ” मी आजारातून नुकताच बरा होत होतो तितक्यात बिग बॉसच्या तिसऱ्या परवाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी माझं शरीर काम करण्यासाठी तयार नव्हतं. कारण माझ्या शरीरावर कॅथेटर लावण्यात आलं होतं.

संपूर्ण अंगावरती वायर होत्या. मात्र मनात जिद्द कायम होती. जिद्दीने पुढे जायचं असं म्हणत मी प्रोमो शूट केला. त्यानंतर शूटिंगच्या पूर्ण वेळामध्ये माझ्या शरीरावरील वायरी लपवण्यात आल्या होत्या. यावेळी काम करताना शरीरात वेदना जाणवत होत्या. मात्र मला हे काम पूर्ण करायचं होतं.” एवढ्या मोठ्या आजाराला तोंड देऊन महेश मांजरेकर आता पुन्हा आल्याने खरोखरच वाघ परत आलाय असं म्हणायला हरकत नाही.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *