भीषण अपघातात तीन रिक्षांचा चक्काचूर; घटनेनं पुणे हादरलं

पुणे | महाराष्ट्रात सद्या अपघात होण्याचं प्रमाण अधिकच वाढल आहे. एवढच नाही तर पुणे शहरात देखील रोज काहीना काही अपघात होतच असतो. पुणे हे विद्येच माहेरघर असल तरीही या शहरात वाहने कशी चालवावी तसेच यासाठी केलेल्या उपाययोजना असल्या तरीही का सारखे येथे अपघात होतात ? हा मोठा प्रश्न आहे.

आज सकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्यातील हडपसर येथील गाडीतळ येथे सिमेंट मिक्सर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. यावेळी सिमेंट मिक्सर ट्रकन रिक्षांना जाऊन धडक दिली. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू झाला. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सिमेंट मिक्सरचा ट्रक हा सोलापूरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत होता. यावेळी सोलापूर रस्त्यावर रवीदर्शन समोरील लक्झरी आणि एसटी बस स्टँडवर एक दुचाकी चालक चुकीच्या दिशेने येत होता. त्या दुचाकीला वाचवन्याच्या नादात ट्रक चालकाच नियंत्रण सुटल. यामध्ये ट्रक एका झाडाला धडकून रिक्षांवर उलटला. यामध्ये चार रिक्षांचा चक्काचूर झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हडपसरचा गाडीतळ हा विभाग दररोज वाहनांमूळ वाहतूक कोंडी होते. पोलीस आणि अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले असून सिमेंट मिक्सरचा ट्रक क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. या अपघातात जखमी झालेल्या तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *