चोरांच्या दुनियेतील बादशाह असलेली ही महिला करतेय जगावर राज्य

मुंबई | आयुष्याच्या रस्त्यावर कधी कोणते वळण येईल याची काहीच शाश्वती नसते. कधी कधी अगदी सर्व उध्वस्त झालेलं असताना देखील मनात जिद्द कायम असल्यास सर्व काही नव्याने उभं करता येतं. याच उत्तम उदाहरण असलेल्या अनेक व्यक्ती आहेत. मात्र आज आपण एका चोर महीले विषयी जाणून घेणार आहोत. ही चोर महिला आज एवढी प्रसिध्दी झोतात आहे की, संपूर्ण जगभरात तिला ओळखले जाते.

सोशल मीडियावर पूर्वी फक्त फेसबुक हे एकच मध्यम होते. यात अँड्रॉइड फोन आल्यानंतर आणखीन बदल होत गेले. हळूहळू यावर व्हास्टॲप, ट्विटर, इंस्टाग्राम असे अनेक मध्यम दाखल झाले. त्यामुळे या मार्फत प्रसिद्ध होता येणे अगदी लहान चिल्या पिल्ल्या मुलांसाठी देखील सहज शक्य झाले आहे. एकेकाळी चोरीच्या टोळक्यातील मुख्य सूत्रधार असलेली ही महिला जेलची हवा खात होती. शिक्षा संपल्यानंतर ज्यावेळी ती बाहेर आली तेव्हा तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. झालेली बदनामी आणि इतर सर्व त्रास सहन करत तिने जिद्दीने मॉडलिंगमध्ये करिअर केले. आज ती सोशल मीडियावर प्रचंड वायरल आहे.

लाखाहून अधिक तिचे चाहते आहेत. तिच्या देखनेपणावर अनेक जण फिदा आहेत. एका वृत्तवाहिनीने तिच्या आयुष्यातील काळया आणि सुंदर गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. याच बद्दल आज आपण देखील जाणून घेणार आहोत. “जगातील सर्वात हॉट चोर” अशी ओळख असलेल्या या मॉडेलचे नाव स्टेफनी ब्यूडॉइन असे आहे. आपल्या मॉडेलिंगमधून तिने आज तिच्या नावाला लागलेला डाग पुसून टाकला आहे. साल २०१५ मध्ये स्टेफनी बीने मॉडेलिंग मॅनेजमेंटमध्ये पदार्पण केले.

साल २०१४ मध्ये चोरीच्या एका प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती. कॅनडा येथील काही अल्पवयीन मुलांचे तिने आणि तिच्या टोळक्याने अपहरण केले होते. यात तिला पकडण्यात आले. नंतर तिला ९० दिवसांची कारावासाची शिक्षा देखील झाली. यात तिने चाळीस घरांमध्ये चोरी करून तब्बल 40 लाखांचा मुद्देमान लंपास केला होता तसेच अनेक मूल्यवान वस्तू देखील चोरल्या होत्या.

त्यावेळी “सेक्सी थिफ” नावाचं तिचं फेसबुक पेज होतं. फेसबुकने तिला हे पेज डिलीट करण्याचे निर्देश देखील दिले होते. तसेच ज्यावेळी ती शिक्षा भोगून बाहेर निघाली तेव्हा न्यायालयाकडून तिला अनेक अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या. ज्यावेळी मॉडेलिंग मध्ये तिने पदार्पण केले त्यावेळी तिच्या आधीच्या आयुष्यातील चोरीच्या प्रकरणाचा ती मॉडेलिंग मध्ये वापर करू शकत नाही असे तिला बजावण्यात आले होते.

या सर्व गोष्टींना सहमती दाखवत तिने मॉडेलिंग मध्ये पदार्पण केले. सध्या फेसबुक वरती चे १ लाख ३० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिच्या सुंदरतेवर अनेक जण आजही फिदा आहेत. नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही भन्नाट फोटो व्हायरल झालेत. तिचे मादक आणि हॉट फोटो पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *