सलमानच्या चित्रपटात साउथ मधील हा दिग्गज अभिनेता झळकणार

मनोरंजन | एका बाजूला बॉलिवूड तर दुसऱ्या बाजूला साऊथ इंडियन सिनेमाच्या खूपच चर्चा रंगत येत आहेत. काही बॉलिवूडचे कलाकार साऊथ चित्रपटात काम करत आहेत. तर काही साऊथचे कलाकार बॉलिवुडमध्ये काम करत आहेत. त्यापैकी साऊथ मधील राम चरण हा प्रसिद्ध अभिनेता आता बॉलिवूड दबंग सलमान खानच्या आगामी सिनेमात दिसणार आहे.

गॉडफादर या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच झाला. या कार्यक्रमात अनेक दिग्गज मंडळी देखील होती. एवढच नाही तर यात सलमान खान आणि चिरंजीवी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान दोघांनी चित्रपटाविषयी अनेक किस्से सांगितले. या कार्यक्रमातच सलमान खानने सर्वांना आनंदाची बातमी दिली खास म्हणजे राम चरणच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच आनंददायी आहे. कारण सलमान खानचा आगामी चित्रपट किसी का भाई किसी की जान’मध्ये राम चरणची एन्ट्री होणार आहे.

सलमानन सांगितला किस्सा :
सलमान खानने यावेळी साऊथ सुपरस्टार राम चरणसोबत किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात स्क्रीन शेअर करणार असल्याचे सांगितले. सलमान खानने यावेळी सांगितले की, ‘ही खरी गोष्ट आहे. आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करत होतो. मी वेंकी उर्फ ​​व्यंकटेश डग्गुबतीसोबत शूटिंग करत असल्याने राम चरण मला भेटायला आला. तो म्हणाला मला तुझ्यासोबत काम करायचे आहे, मी नाही म्हणालो, मग तो म्हणाला मला तुझ्यासोबत काम करायचे आहे आणि मला तुझ्या आणि वँकीसोबत पडद्यावर यायचे आहे.’

सलमान खानने पुढे सांगितले की, ‘मला वाटले की तो मस्करी करतोय, म्हणून मी म्हणालो की ठीक आहे. पण दुसऱ्या दिवशी तो व्हॅन, कपडे आणि बाकी सगळ्या गोष्टी घेऊन सेटवर तयार होता. मी त्याला पाहून आश्चर्यचकित झालो. मी त्याला विचारलं, तू इथे काय करतोस? त्यावर तो म्हणाला, तू मला खूप आवडतोस मला तुझ्यासोबत काम करायचं आहे, तू मला ते करुदे. त्यावर मी तयार झालो आणि आम्ही एकत्र काम केलं.’

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *