निलेश साबळे बरोबर फोटोत दिसत असलेली ही गोड मुलगी आता झाली आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री ‘या’ हिट मालिकेत करते काम….

 

मुंबई | सध्याच्या घडीला सोशल मीडियावर प्रत्येकच व्यक्ती सक्रिय असतो. सोशल मीडिया हे एक असं माध्यम झालं आहे जिथे आपल्याला कोणत्याही व्यक्तीची पुरेशी माहिती मिळूच शकते. यात कलाकार तर अजिबात अपवाद नाहीत. कलाकार त्यांचे सर्व अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशात अनेक कलाकारांनी त्यांच्या बालपणीचे फोटो फोटो देखील सोशल मीडिया वरती पोस्ट केलेले आहेत. प्रत्येकच व्यक्तीला आपलं बालपण नेहमीच हवहवसं वाटतं. बालपणातील सर्व मजा मस्ती आठवून अनेक जण आनंदी होतात.

अशात आता सोशल मीडियावर एका मराठी अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो खूप चर्चेत आला आहे. यामध्ये ही सुंदर चिमुकली डॉ. निलेश साबळे जवळ बसलेली दिसते आहे. नुकताच तिने आपला हा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. आता ही अभिनेत्री आहे तरी कोण याचा अनेकजण शोध घेत आहेत.

ही अभिनेत्री सध्या एका गाजलेल्या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. फोटो पाहून समजते की, साधारणता शालेय शिक्षण घेत असताना तिने निलेश साबळे बरोबर फोटो क्लिक केला आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री गौरी कुलकर्णी आहे. तिने आजवर काही नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर तिला ‘ऑलमोस्ट सफुल संपूर्ण’ या मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली. आता गौरी ‘अबोली’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

तिचा निलेश साबळे बरोबरचा हा फोटो खूप व्हायरल होतं आहे. चाहते तिला यावर अनेक प्रश्न विचारत आहेत. तिने हा फोटो शाळेत असताना काढला होता. त्यावेळी ती ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर पोहचली होती. त्यावेळी तिने निलेश साबळे बरोबर हा फोटो क्लिक केला होता.

 

निलेश साबळे या अभिनेत्याने चला हवा येऊ द्या वर चांगलीच हवा केली आहे. त्याचा अभिनय आणि त्याचं लेखन कौशल्य नेहमीच भन्नाट राहीलं आहे. त्यामुळेच या अभिनेत्रीला देखील लहानपणापासूनच त्याच्या अभिनयाची गोडी लागली होती.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *