आदीपुरुष या चित्रपटात दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री

मनोरंजन | मराठी तार तारका अनेक मराठी सिनेमातून हिंदी सिनेमात काम करताना दिसतात. या आधी मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये काम केलं. त्याचप्रमाणं आता आदिपुरूष नावाचा बॉलिवूडचा एक नवीन सिनेमा लवकर प्रदर्शित होणार असल्याचं समजत आहे. या सिनेमात मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काम करणार आहे. अशी माहिती तिन सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. आज या सिनेमाचं पोस्टर लाँच झाल असून उद्या दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी टीजर प्रदर्शित होणार आहे.

तेजस्विनीनं सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत एक छोटीशी पोस्ट शेअऱ केली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे की, ‘हे आहे आमच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर. सिनेमाचा टीझर येत्या २ ऑक्टोबरला संध्याकाळी प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा टीझर बघायला तयार राहा…’तेजस्विनी पंडितसह इतरही मराठमोळे कलाकार या चित्रपटात दिसणार असल्याचं तीन पोस्टमध्ये लिहिलं. यात ऐशर्थ जाधव, अक्षया देवधर,ऋतुजा बागवे, सावणी रवींद्र हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

मराठमोळ्या कलाकारांप्रमाण चित्रपटाचा दिग्दर्शकही मराठमोळा: मराठमोळ्या कलाकारांप्रमाण चित्रपटाचं दिग्दर्शन ही मराठमोळा दिग्दर्शक ‘तानाजी फेम ‘दिग्दर्शक ओमकार राऊत हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर क्रिती सैनन,सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. तेजस्विनी या सिनेमात कोणती भूमिका साकारणार आहेत ते मात्र अजूनही समोर आल नाही. हा सिनेमा बाहूबलीपेक्षा भव्य दिव्य असणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *