या मराठी हॉट अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा; चाहते म्हणतात…

 

मुंबई | मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिलीय. तिचा साखरपुडा पार पडलाय. या सुंदर क्षणांचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.

 

 

तिने या फोटोंना कॅप्शन देत म्हटलंय – ‘मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत जीवनाची नवीन क्षितिजे आखत आहे! तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा असाव्यात. विजय पलांडे असं तिच्या होणाऱ्या पतीचं नाव असून तो एक मेकअप डिझायनर आहे.

 

 

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘काय रे रास्कला’ अशा चित्रपटात दिसली होती.

 

भाग्यश्रीने तेलगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. तसेच हिंदी ‘देवा श्री गणेशा ‘ या मालिकेत तिनं काम केलंय.

 

कोण आहे विजय ? – भाग्यश्री मोटेच्या साखरपुड्यानंतर आयोजित पार्टीत बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन उपस्थित होता. इतकंच नव्हे तर ऋतिकसोबत त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसुद्धा उपस्थित होती.

 

अनेकांना हा प्रश्न पडला आहे की, भाग्यश्रीच्या साखरपुड्यात ऋतिकची उपस्थिती कशी?विजय ऋतिकचा फारच खास आहे. त्यामुळे त्यांच्या या आनंदाच्या क्षणात ऋतिक न चुकता सहभागी झाला होता. विजय हा ऋतिकचा मेक अप आर्टिस्ट आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *