अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिसत असलेली ही चिमुकली आज गाजवते बॉलिवूड, बिग बींबरोबर देखील केलं आहे काम, ओळखा पाहू ही आहे तरी कोण?

मुंबई | सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे चाहत्यांना आपल्या आवडत्या कलाकाराविषयी सर्व माहिती सहज उपलब्ध होते. बऱ्याच वेळा कलाकार आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या अपडेट स्वतः देत असतात.

तर अनेक वेळा वेगवेगळ्या स्त्रोतांकडून चाहत्यांपर्यंत आपल्या आवडत्या कलाकाराची माहिती पोहोचत असते. कलाकार त्यांच्या दैनंदिन जीवनात काय करत आहेत? ते कुणाला डेट करत आहेत का? त्यांच्या आयुष्यात काही अडचणी किंवा त्यांच्या आयुष्यातले आनंद या सर्वच गोष्टींची माहिती चाहत्यांना ठेवावी वाटते.

यामध्ये सोशल मीडियावरती अचानक आपल्या आवडत्या कलाकाराचा फोटो समोर येतो. यावेळी चाहत्यांना हा कलाकार नेमका कोणता आहे हे ओळखणे कठीण होऊन बसते. मग यानंतर सुरू होतं फोटो ओळखण्याचं सत्र. अनेक जण एकमेकांना चॅलेंज देत फोटो ओळखण्याची धडपड करत असतात.

अशात सोशल मीडियावर सध्या एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो खूप व्हायरल होत आहे. यामध्ये बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते बिग बी आहेत. तसेच त्यांच्याबरोबर एक छोटी मुलगी देखील आहे. ही चिमुकली कॅमेऱ्याकडे पाहून स्माईल देत आहे. हा फोटो कोणत्यातरी एका मोठ्या समारंभाचा असल्याचं पाहायला मिळत आहे. फोटोत त्या चिमुकलीने एक सुंदर असा टॉप घातला आहे ज्यावर फुलांची आकर्षक डिझाईन आहे.

तसेच तिचा लॉंग बॉबकट आणि तिच्या चेहऱ्यावरचा निरागसपणा अगदी स्पष्ट दिसत आहे. तर आता फोटोत दिसत असलेल्या या चिमुकलीने बॉलीवूडवर राज्य केलं आहे. नेमकी कोण आहे ही गोड मुलगी हेच या बातमीतून जाणून घेऊ.

अमिताभ बच्चन यांचा बॉलीवूडच्या प्रसिद्धीमध्ये मोलाचा वाटा आहे. त्यांनी आजवर या बॉलीवूडला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. त्यांच्यामुळे बऱ्याच व्यक्तींना बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी देखील मिळाली आहे. फोटोत दिसत असलेल्या या चिमुकलीने देखील बिग बींबरोबर अभिनय केला आहे. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये दिसत असलेली ही गोड मुलगी अभिनेत्री रविना टंडन आहे.

तिने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यावेळी तिने सलमान खान बरोबर स्क्रीन शेअर केली होती. साल 1994 मध्ये ‘मोहरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये रवीनाने देखील अभिनय केला. हा चित्रपट तिच्या अभिनयाच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.

या अभिनेत्रीने देखील बॉलीवूडमध्ये दमदार आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. मात्र आता ती रुपेरी पडद्यापासून थोडी दूर झाली आहे. केजीएफ 2 या दाक्षिणात्य चित्रपटात ती शेवटची झळकली होती.

आता ही अभिनेत्री 43 वर्षांची झाली आहे. मात्र अजूनही तिची सुंदरता कायम आहे. ती नेहमीच फिट राहणे पसंत करते. नित्यनियमाने योगा करणे आणि संतुलित आहार घेणे याकडे ती सर्वाधिक लक्ष देते. रवीना सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रिय असते. यावरती ती तिच्या आयुष्यातील अनेक वेगवेगळ्या अपडेट्स चाहत्यांपर्यंत पोहोचवते.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *