फोटोत क्युट स्माईल देत असलेली ही चिमुकली चला हवा येऊ द्यामध्ये करत आहे राज्य

मुंबई | सोशल मीडियावर सध्या बालपणीच्या फोटोंचा ट्रेंड सुरू आहे. अनेक सोशल मीडिया युजर आपल्या बालपणीचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. तसेच यामध्ये अनेक कलाकार मंडळी देखील शामिल झाली आहेत. अनेक कलाकार स्वतःच्या बालपणीचे फोटो शेअर करत आहेत. चाहत्यांना देखील या कलाकारांचे बालपणीचे फोटो पाहायला खूप आवडते. आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसतो याची प्रत्येकाला उत्सुकता असते. अशात सोशल मीडियावर या एका चिमुकलीचा फोटो खूप व्हायरल होत आहे.

सफेद रंगाचा फ्रॉक आणि केसांचा बॉबकट असलेली ही छोटी मुलगी कॅमेरात पाहून मस्त स्माईल देत आहे. खरंतर तिचा हा फोटो पाहून अनेकांनी पटकन ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे ओळखलं आहे. श्रेया बुगडेचा चेहरा आजही अगदी बालपणी सारखाच दिसतो आहे. त्यामुळे फोटोत दिसत असलेली ही चिमुकली श्रेया बुगडे असल्याचं अनेकांनी चटकन ओळखलं आहे. श्रेया ही मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. इतर कलाकारांप्रमाणे ती देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करते.

ट्रॅडिशनल लुकमध्ये असलेले समारंभ तसेच ग्लॅमरस लुकमध्ये असलेल्या पार्ट्या या सर्वांचेच फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. त्याचबरोबर श्रेया सोशल मीडियावर तिच्या कुटुंबीयांचे देखील अनेक फोटो शेअर करते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या घराचा एक सुंदर व्हिडिओ देखील शेअर केला होता. तसेच सोशल मीडियावर येत असलेले रील व्हिडिओ देखील ती बनवत असते.

त्यामुळे तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या बालपणीचा हा फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये श्रेया बुगडे लहानपणी जशी दिसत होती तशीच आताही दिसते. या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत.

विशेष म्हणजे चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे ती घराघरात पोहोचली. चला हवा येऊ द्या याच कार्यक्रमाने तिला मोठी पसंती मिळवून दिली. या कार्यक्रमामध्ये भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, निलेश साबळे अशी कलाकार मंडळी आहेत. या सर्वांमध्ये श्रेया बुगडे ही एकटी महिला अभिनेत्री या शोमध्ये कार्यरत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *