वडीलांच्या मांडीवर बसलेली ही चिमुकली गाजवत आहे बॉलीवूड, आता ती सुद्धा झाली आहे एका बाळाची आई

मुंबई | प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सुंदर वयाचा टप्पा कोणता असं कोणी विचारलं तर तारुण्या ऐवजी बालपण आग्रहाने म्हणावे लागेल. कारण बालपणी प्रत्येक व्यक्ती एक आरामदायी आयुष्य जगत असतो. आपण लहान असताना स्वतः देखील हसत असतो आणि इतरांना देखील आपण हसवत असतो.

बालपणीचे हे दिवस कोणीच जसेच्या तसे धरून ठेवू शकत नाही. काळानुसार हे दिवस बदलतात. मात्र आपलं बालपण प्रत्येक व्यक्ती कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतो. असाच एका बॉलीवूड अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही चिमुकली तिच्या वडिलांच्या मांडीवर बसलेली आहे. गोरी पान गोल गुबगुबीत गाल आणि अंगावर निळ्या रंगाचे स्वेटर या चिमुकलीने घातले आहे. या छोट्या मुलीचे सोशल मीडियावर अनेक फोटो समोर आले आहेत. एका फोटोमध्ये ती केसांची पोनी बांधलेली दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती आपल्या मम्मीबरोबर केक कापताना दिसत आहे. या चिमुकलीची ओळख अजूनही अनेकांना पटलेली नाही.

फोटोत दिसत आलेली ही गोड मुलगी आता स्वतः एका बाळाची आई आहे आणि तिने एका प्रसिद्ध क्रिकेटपटू बरोबर विवाह केला. कदाचित आता हे वाचून तुम्हाला समजलं असेलच की ही अभिनेत्री अनुष्का शर्मा आहे. जी सध्या बॉलीवूड चांगलंच गाजवत आहे. अनुष्काने आतापर्यंत बॉलीवूडमधील मोठमोठ्या अभिनेत्यांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान अशा अनेक मोठ्या अभिनेत्यांबरोबर तिने काम केलं आहे. रणवीर सिंग बरोबर देखील तिने स्क्रीन शेअर केली आहे. सध्या अनुष्का दक्षिण आफ्रिकेमध्ये राहत आहे. इथे ती पती विराट कोहली आणि मुलगी वामिका बरोबर राहते. अनुष्का सध्या आपल्या मुलीच्या संगोपणामध्ये व्यस्त आहे. तिचे व्हायरल होत असलेले हे फोटो तिनेच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दाखवली.

अनुष्का आणि विराट कोहली यांच्या मुलीचे नाव वामिका असे आहे. मात्र वामिकाला अजून कोणीही पाहिले नाही. अनुष्का आणि विराट यांच असं म्हणणं आहे की, त्यांना त्यांच्या मुलीला सोशल मीडियापासून सध्या तरी दूर ठेवायचं आहे. त्यामुळे या दोघांनी देखील अद्याप आपल्या मुलीचा बालपणीचा फोटो शेअर केलेला नाही.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *