फोटोत दिसत असलेली ही चिमुकली करतेय बॉलिवूडवर राज्य

मुंबई | सोशल मीडियावर अनेक कलाकारांच्या बालपणीचे फोटो सतत व्हायरल होतं असतात. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकाराचे लहानपणीचे फोटो पाहायला खूप आवडते. अशात सोशल मीडियावर सध्या एका चिमुकलीचा एक फोटो खूप व्हायरल होतं आहे. यामध्ये ही छोटी मुलगी एका लहान बाळाजवळ बसलेली आहे.

तिने एक सुंदर फ्रॉक घातला आहे. तसेच केस वरती बांधले आहेत, आणि बाळा जवळ बसून आपल्या गालावर बोट ठेवत ही चिमुकली पोज देत आहे. तिचा हा फोटो पाहून अनेक जण ही नेमकी कोणती अभिनेत्री आहे याचा शोध घेत आहेत. आता अजून तुम्ही देखील या अभिनेत्रीला ओळखू शकले नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही छोटी मुलगी आता बॉलीवूड गाजवत आहे.

फोटोत दिसत आलेली ही चिमुकली अनन्या पांडे आहे. अनन्या पांडेचा जन्म ३० ऑक्टोबर १९९८ रोजी अभिनेता चंकी पांडे आणि कॉस्च्युम डिझायनर भावना पांडे यांच्या घरी झाला. तिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 2017 पर्यंत शिक्षण घेतले. साल 2019 मध्ये आलेल्या स्टूडेंट ऑफ द इअर या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. पांडेने पुढे कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्यासमवेत पतीची पत्नी और वो मध्ये तिने अभिनय केला.

साल 2020 च्या अ‍ॅक्शन फिल्म खाली पीलीमध्ये देखील तिने काम केले. ज्यात ईशान खट्टर होता. २०२२ मध्ये, ती दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासमवेत अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या रोमँटिक नाटक गेहरायानमध्ये दिसली . आता अनन्या पुढे विजय देवरकोंडा सोबत पुरी जगन्नाध यांच्या लिगर या अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे , जो हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये द्विभाषिक निर्मिती आहे. ती चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांच्यासोबत खो गए हम कहाँ या आगामी चित्रपटातही दिसणार आहे.

अनन्या सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. आता तिचा लहानपणीचा जो फोटो व्हायरल होतं आहे. हा फोटो देखील तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. या फोटोवर देखील चाहत्यांनी लाइक्स आणि हार्ट ईमोजीचा वर्षाव केला आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *