फोटोत दिसत असलेली ही चिमुकली एकेकाळी करत होती अभिनय क्षेत्रावर राज्य; ओळखा पाहू

नवी मुंबई | सोशल मीडियावर सध्या एक फोटो जोरदार व्हायरल होतं आहे. यात एक गोड चिमुकली तिच्या आई बाबांबरोबर पोज देत आहे. ही छोटी मुलगी आज बॉलीवूडची खूप सुंदर अभिनेत्री आहे. तिने आता पर्यंत सलमान खान आणि अजय देवगण बरोबर अनेक चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. या बालपणीच्या फोटोमध्ये ती जितकी गोड दिसत आहे तितकीच ती आता मोठी झाल्यावर देखील सुदंर दिसत आहे.

आजवर तिने बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले. एका श्रीमंत राजकीय कुटुंबातील मुला बरोबर तिने विवाह केला आहे. तिच्या लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रात फार दिसली नाही. कदाचित आता पर्यंत तुम्ही या अभिनेत्रीला ओळखले असेल. जर तुम्हाला अजून देखील तिची ओळख पटली नसेल तर तुमच्या माहिती साठी सांगतो. फोटोत दिसत आलेली ही चिमुकली आयशा टाकीया आहे.

आपल्या दमदार अभिनयाने तिने अनेकांच्या मनात राज्य केले. तिच्या सुंदरतेचे आजही अनेक जण दिवाणे आहेत. तिने साल २००९ मध्ये फरहान आजमी बरोबर लग्न केले. या दोघांना एक बाळ देखील आहे. आपल्या मुलाचे नाव त्यांनी मिकेल असे ठेवले आहे. तिचा मुलगा देखील खूप गोड दिसतो. ती तिच्या लहानपणी जशी गोड दिसायची तसाच तिचा मुलगा देखील खूप क्यूट दिसतो आहे.

सध्या ती आपल्या मुलाचे संगोपन करत आहे. ती आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नाही. आपल्या मुलाला ती संपूर्ण वेळ देते. एका माध्यमाला तिने मुलाखत दिली होती. त्यावेळी ती म्हणाली की, ” एक आई होऊन आपल्या बाळाला सांभाळणे त्याला चांगले संस्कार देणे हे माझ्यासाठी सध्या महत्वाचे आहे. माझं बाळ मोठ झालं की, मी पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांची सेवा करेल.” असे ती या मुलाखतीत म्हणाली होती.

अभिनेत्रीने तिचा बालपणीचा फोटो स्वतः शेअर केला आहे. ती सध्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी देखील तिने सोशल मीडियावर आपले एक वेगळे जग निर्माण केले आहे. यात ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. आपल्या बाळा बरोबर देखील तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. तसेच स्वतः च्या बालपणीचा फोटो शेअर करत तिने मम्मी, पप्पा आणि मी असं कॅप्शने देखील लिहिलं आहे.

तिचा हा फोटो खूप व्हायरल होतं आहे. अनेक चाहते तिला यासाठी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. साल २०१३ मध्ये आलेला चित्रपट आप के लिये हम या मध्ये ती शेवटची दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. मात्र ती सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. यावर तिचे १.२ मिलियन फॉलोवर देखील आहेत. साल २००४ मध्ये तिने टारझन द वंडर कार या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर ती कॅश, ये दिल मांगे मोर, सोचाना था, वॉन्टेड, सलामे इश्क अशा चित्रपटांमध्ये अभिनय करताना दिसली.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *