रेखा यांच्या बरोबर फोटोत दिसत असलेला हा चिमुकला सध्या आहे बॉलिवूडचा हँडसम आणि श्रीमंत हिरो, एवढ्या कोटींची करतो कमाई…. !

मुंबई | रेखा यांनी आजवर बॉलीवूडला आपल्या अभिनयाने चार चाँद लावले आहेत. सध्या त्या अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी देखील त्यांचे आधीचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. रेखा यांनी त्यांच्या काळात केलेले चित्रपट गाणी ही आजही अनेक तरुणांना वेड लावणारी आहेत. त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बरोबर अनेक चित्रपट साकारले होते. त्यांचे “इन आखों की मस्ती…”, ” मन क्यू बेहका….” अशी काही गाणी कायमच सदाबहार राहिली आहेत.

रेखा आता ६७ वर्षांच्या झाल्या आहेत. काही रियालिटी शो मध्ये आता त्या दिसतात. त्यांनी आता पर्यंत ‘उमराओ जान’, ‘खूबसूरत उत्सव’, ‘सिलसिला’,’खून भरी मांग’,’दिल है तुम्हारा’, ‘बीवी हो तो ऐसी’, ‘आस्था’, ‘कोई मिल गया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये सुंदर अभिनय केला आहे. त्यांच्या याच अभिनयाने आजही त्या सोशल मीडियावर सक्रिय नसल्या तरी देखील त्यांच्या फॅन पेजवर त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येत असतात.

अशात सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो खूप व्हायरल होतं आहे. यात त्यांच्या बरोबर अनेक लहान मुलं बसलेली आहेत. यातील काही मुलांनी अभिनय क्षेत्रात मोठी झेप घातली आहे. त्यात त्यांच्या बरोबर एक असा अभिनेता देखील आहे जो सध्या खूप प्रसिद्ध आहे. तसेच आपल्या अभिनयाने तो कोटींच्या संपत्तीचा मालक देखील झाला आहे.

तो एका प्रसिद्ध दिग्दर्शकांचा मुलगा आहे. हो फोटोमध्ये रेखा यांच्या मागे उजव्या बाजूला खाली वाकून उभा असलेला हा चिमुकला हृतिक रोशन आहे. त्याने आजवर बॉलीवूड चांगलेच दणाणून सोडले आहे. त्याचा अभिनय आणि भल्या भल्यांना जमणार नाही अशा डान्स स्टेप्स करून तो खूप प्रसिध्दी झोतात आहे.

हृतिकने त्याच्या अभियन्याच्या जोरावर आता पर्यंत कोटींची कमाई केली आहे. त्याची सध्याची नेट वर्थ ही २६० कोटींहून अधिक आहे. त्याला अनेक महागड्या गाड्यांची देखील आवड आहे. त्याच्याकडे जवळपास पाच ते सहा महागड्या ब्रँडच्या चार चाकी गाड्या आहेत. त्याच्या संपत्ती प्रमाणे तो मनाने देखील खूप श्रीमंत आहे.

हृतिकच्या कोई मिल गया, क्रिश, क्रिश २ अशा चित्रपटांनी त्याने अनेक लहान मुलांना देखील आपल्या अभिनयाची भुरळ घातली आहे. त्यामुळेच त्याचा चाहता वर्ग हा लहान मुलांपासून ते मिठ्यांपर्यंतचा आहे.

रेखा त्यांच्या या फोटोमध्ये हृतिक बरोबर अन्य काही कलाकार देखील आहेत. फोटोतील हे चिमुकले आज बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमवत आहेत. यात तनीषा मुखर्जी, जुगल हंसराज, सुनैना रोशन हे कलाकार देखील आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *