फोटोत दिसत असलेला हा चिमुकला आज करतोय बॉलिवूडवर राज्य; ओळखा पाहू

दिल्ली | सध्या सोशल मीडियावर कलाकारांच्या बालपणीचे अनेक फोटो खूप व्हायरल होतं आहेत. अशात आता सोशल मीडियावर या लहान मुलाचा फोटो देखील चर्चेत आहे. फोटोत दिसत असलेला हा लहान मुलगा सध्याच्या घडीला बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. त्याने आजवर अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या सुंदर अभिनयाने त्याने यशाचे मोठे शिखर गाठले आहे.

अभिनय क्षेत्रात नाव कमवत असताना त्याने आपली सामाजिक कार्ये देखील सुरू ठेवली आहेत. आज त्याच्या सामाजिक कार्यामध्ये त्याने मोठे नाव कमवले आहे. यातून तो प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाला आहे. अनेक व्यक्तींसाठी तो देवदूत बनला आहे. आपल्या चित्रपटातून होणाऱ्या कमायीमधील बरीच रक्कम तो गरिबांना दान करतो. गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्याच्या अनेक सामाजिक संस्था आहेत.

कदाचित आता पर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की, हा गोड चिमुकला नेमका कोणता अभिनेता आहे. फोटोत दिसत असलेला मोठ्या डोळ्यांचा हा लहान मुलगा आता खूप हँडसम दिसतो आहे. तर हा चिमुकला दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेता सोनू सूद आहे. सोनुने आजवर अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाने आज त्याने यशाचे मोठे शिखर गाठले आहे. सलमान खानच्या दबंग या चित्रपटातून त्याला खूप मोठी प्रसिद्धी मिळाली. यात त्याने खलनायकाच्या भूमिकेत काम केले.

त्याच बरोबर कोरोना महामारीच्या काळात तर तो अनेकांसाठी देवा प्रमाणे धावून आला. त्यामूळे अनेक जनांसाठी तो रियल लाईफ हिरो झाला. चित्रपटात त्याने कितीही खलनायकाच्या भूमिका केल्या तरी खऱ्या आयुष्यात तोच खरा हिरो आहे. कोरोना महामारित त्याने अनेक व्यक्तींचे स्थलांतर केले. वेगवेगळ्या गावातून आणि राज्यातून मुंबईमध्ये आलेल्या लोकांना त्याने स्वतः सर्व खर्च करत घरी पाठवले.

तसेच नेहमीच त्याच्या घराबाहेर अनेक नागरिकांची मोठी गर्दी असते. ही गर्दी वेगवेगळ्या आजाराने तसेच वेगवेगळ्या आर्थिक विवंचनेत असलेल्या लोकांची असतें. या सर्वांचे प्रश्न ऐकून तो त्यांना मदत देखील करतो. त्याच्या अनेक सामाजिक संस्था आहेत या मार्फत तो प्रत्येकाचे प्रश्न त्याला जमेल तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करतो.

या कामगिरी मुळे त्याला 2020 SDG स्पेशल ह्यूमैनिटेरियन एक्शन या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. 30 जुलै 1973 रोजी त्याचा पंजाब मध्ये जन्म झाला. त्याने सुरुवातीला मॉडेलिंग मध्ये देखील काम केले. आपल्या आयुष्यात त्याने आज हिंदी चित्रपटसृष्टीत मोठी कामगिरी केली आहे. त्यामूळे अनेक प्रतिभावान कलाकारांमध्ये सध्याच्या घडीला त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

आता सोशल मीडियावर त्याचा हा बालपणीचा फोटो व्हायरल होतं आहे. यात तो साधारणता शालेय वयात असेल असे समजते. त्याचे अनेक चाहते या फोटोवर चॅलेंज घेत आहेत. तसेच ज्यांना त्याच्या या फोटोची खरी ओळख पटत आहे ते सर्व जण त्याला रियल हिरो अशी कमेंट करत आहेत.

 

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *