पंजाबी सिनेसृष्टी पुन्हा एकदा हादरली; प्रचंड रक्त स्त्राव झाल्याने या दिग्गज गायकाने सोडले प्राण….

दिल्ली | मनोरंजन विश्वातील अनेक व्यक्ती या जगाचा निरोप घेत आहेत. अनेक कलाकार वेगवेगळ्या आजाराने ग्रासले आहेत. त्यातील काहींना कोणताही आजार नसताना फक्त एका हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा जीव गेला आहे. या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने तसेच अपघात आणि किडनीचे आजार होऊन अनेक कलाकार या दूनियेपासून दूर निघून गेले आहेत. अशात आता आणखीन एका प्रसिद्ध गायकाचे निधन झाले आहे.

काही दिवसांपूर्वीच गायक केके याचा मृत्यू झाला. लाईव्ह गाण्याच्या शो मध्ये त्याची प्राण ज्योत मालवली. केकेने आता पर्यंत अनेक सुमधुर आणि हिट गाणी गायली होती. इम्रान हाश्मी याच्या अनेक चित्रपटांतील गाण्यांना त्याने आवाज दिला होता. आज तो आपल्यात नसला तरी त्याच्या गाण्यांनी तो नेहमी आपल्या आठवणीत राहणार आहे.

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये गात असताना त्याला त्रास होतं होता. कारण त्या ठिकाणी मर्यादेपेक्षा जास्त लोकांची गर्दी होती यामुळे त्याला श्वास नीट घेता येत नव्हता. यावेळी शेवटचे गाणे झाल्यावर त्याला चक्कर आली. यात त्याला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

तसेच सिद्धू सिंग मुसेवला याची काही दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली. यावेळी भर रस्त्यात त्याच्यावर गोळीबार झाला. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर देखील उमटले. त्यावेळी संपूर्ण पंजाब रडला होता. सिद्धू सिंग मुसेवलाच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आता यश आलेले आहे. या प्रकरणात राजकीय वातावरण देखील तापले होते. त्याच्या आई वडिलांनी मोठा आक्रोश केला होता. तसेच चाहते देखील खूप संतप्त झाले होते.

या गायकाच्या निधनानंतर अनेक कलाकारांचे देखील निधन झाले. रसिक दवे, दीपेश भान यांच्यासाखे कलाकार मृत्यू पावले. गाणं कोकिळा लता मंगेशकर यांनी देखील या जगाचा निरोप घेतला. आता आणखीन एका पंजाबी गायकाची प्राण ज्योत मावळली आहे. बलविंदर सफारी यांचे देखील निधन झाले आहे.

साल १९९० मध्ये त्यांनी बॉईज बँडची स्थापन केली. या बँडची सर्वच गाणी आजही हिट आहेत. त्यांनी या बँड मार्फत खूप प्रसिध्दी मिळवली. त्यानंतर त्यांनी चंद मेरे मखना,पाव भांगडा, यार लंगडे अशा काही गाण्यांना आपला आवाज दिला. ही गाणी देखील खूप गाजली. यातून बलविंदर यांनी प्रसिध्दी आणि पैसा दोन्ही गोष्टी कमवल्या. अशात त्यांचं प्रत्येक गाणं हे श्रोत्यांच्या मनात घर करत होतं.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्या निधनाची अफवा पसरवली होती. मात्र नंतर खरोखर त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. एकूण ८६ दिवस ते दवाखान्यात होते. त्यांची बायपास सर्जरी केली होती. तसेच त्यांच्या मेंदूला रक्त स्त्राव झाला होता. यात उपचार सुरू असताना ते त्याला खूप कमी प्रतिसाद देत होते. यातच त्यांचे निधन झाले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *