टायटॅनिक चित्रपटातील हा दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्याआड…

मुंबई | मनोरंजन विश्वात असे अनेक चित्रपट आहेत ज्यांनी संपूर्ण जगभरात राज्य केले आहे. त्यातीलच एक टायटॅनिक चित्रपट. हॉलिवूडच्या या चित्रपटाने सर्वांना भुरळ घातली होती. यातील प्रेम कथा आणि चित्तथारक प्रसंग प्रेक्षकांना खूप आवडला. अशात आता याच चित्रपटातील एका दिग्गज अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे.

टायटॅनिक आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करणारे अभिनेते डेविड वॉर्नर यांचे निधन झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना कर्करोग झाला होता. त्यामुळे या आजाराशी झुंज देत असताना त्यांची प्राण ज्योत मालवली.

२४ जुलै रोजी त्यांनी या झागला अलविदा केले. ते ८० वर्षांचे होते. टायटॅनिक या चित्रपटामध्ये त्यांनी स्पाइसर लवजॉय ही भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनाने वॉर्नर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

त्यांनी ७० ते ८० च्या दशकात चित्रपटसृष्टी खूप गाजवली. वॉर्नर यांनी खलनायकी भूमिका देखील साकारल्या होत्या. यामशेन ‘लिटिल मॅल्कम’, ‘ट्रॉन’, ‘द फ्रेंच लिटिल वुमन’, ‘टाइम बँडिट्स’, ‘स्टार ट्रँक’ या आणि अशा अनेक चित्रपटांत ते खलनायक म्हणून झळकले. त्यांच्या अभिनयाने त्यांनी लाखो प्रेखकांची मने जिंकली होती. आता त्यांचा चाहता वर्ग देखील सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *