Zee Marathi वरील या प्रसिद्ध मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

मुंबई | मन उडू उडू झालं या मालिकेने दोन दिवसांपूर्वी आपला निरोप घेतला. मालिका बंद होणार याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यामुळे या मालिकेचे सर्व प्रेक्षक खूप चिंतेत होते. तसेच अनेक जण ही मलिका बंद करू नका असे म्हणत होते. कलाकारांच्या काही कामामुळे ही मालिका बंद झाली. मंदार देवस्थळी यांच्या दिग्दर्शनात सुरू असलेल्या या मालिकेने खूप कमी काळात प्रेक्षकांची मने जिंकली.

मालिकेत हृता दुर्गुळे ही अभिनेत्री दिपू हे पात्र साकारत आहे. तिने आपल्या अभिनयाने या पात्राला न्याय दिला. यात तिचा सोजवळ स्वभाव पाहायला मिळाला. यात इंद्रा हे पात्र अभिनेता अजिंक्य राऊत साकारत होता. त्याने देखील इंद्रा हे पात्र खूप छान साकारले. मात्र आता मालिका बंद झाल्याने सर्व कलाकार देखील भाऊक झाले. अजिंक्य आणि इतर सर्व कलाकारांनी मालिका बंद होणार असल्याने एकत्र येत शेवटचे सेलिब्रेशन देखील केले.

त्यांच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. यावेळी अजिंक्यने एक भाऊक पोस्ट देखील लिहिली. या मालिकेने मला खूप काही शिकवले. प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. दिग्दर्शकांनी मला दिलेल्या संधीचे मी सोन करण्याचा प्रयत्न केला. आज या मालिकेचा शेवटचा भाग पूर्ण झाला. त्यामुळे आम्ही सगळे थोडे भाऊक आहोत. तुम्ही दिलेले प्रेम आम्ही लक्षात ठेवू. मी वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या भेटीला येईल, असे तो म्हणाला.

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री हृताने प्रतीक शहा बरोबर लग्न केले. तो अभिनेत्री मुग्धा शहा यांचा तो मुलगा आहे. या दोघांचा विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सध्या हृता तिच्या टाईमपास ३ या चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. नुकताच तिचा अनन्या हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या कामाचे कौतुक होतं आहे.

अजिंक्य देखील लवकरच टकाटक २ मध्ये दिसणार आहे. अतिशय चावट आणि विनोदी चित्रपटात अनेक बोल्ड सीन आहेत. यातील एकात अजिंक्यने लीप लॉक किस सीन दिले आहेत. त्यामुळे काही चाहते त्याच्यावर नाराज आहेत. अनेकांनी त्याच्यावर टीका देखील केली आहे. मात्र काहींनी त्याला कौतुकाची थाप देखील दिली आहे.

असे असले तरी मन उडू उडू झालं या मालिकेने आता निरोप घेतला आहे. त्यामुळे अनेक चाहते ही मलिका परत सुरू करा. आधीचे भाग दाखवा. असे म्हणत आहेत. प्रेक्षकांचे प्रेम पाहता ही मालिका पुन्हा सुरू होईल की नाही या बाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. मात्र आता या मालिकेच्या जागी तू चालं पुढं ही नवी मालिका सुरू झाली आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *