खतरों के खिलाडीमध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली मोठी दुखापत 

दिल्ली | खतरों के खिलाडी या शोचे नाव ऐकताच अंगावर काटा उभा राहतो. या शोने आजवर अनेक खिलाडी तयार केले आहेत. साल २००८ पासून हा शो सुरू आहेत. सुरुवातीला हा शो अक्षय कुमार होस्ट करताना दिसत होता. त्यानंतर रोहित शेट्टी हा शो होस्ट करत आहे. या शोची लोकप्रियता अफलातून आहे.

अनेक कलाकार स्वतःला सिद्ध करण्यासाठी या शोमध्ये सहभागी होतात. इथे आल्यावर आपल्या विचार शक्तीच्या पलीकडचे भयावह खेळ खेळले जातात. कधी झुरळ अंगावर सोडले जाते. तर कधी सापांचा सामना करत खेळ खेळावा लागतो. यामध्ये अनेक धाडशी कलाकारांची बोलती बंद होत असते.

यामध्ये नेहमी वेगवेगळे टास्क दिले जातात. आधी तोंडात खराब पाणी घेऊन रिकामा कॅन भरायचा असतो तर कधी उंच ठिकाणावरून चालायचे असते इतकेच नाही तर यामध्ये विजेचे खेळ देखील होतात. एका चिकाटीत स्पर्धकाला उभे केले जाते. त्याच्या बाहेर पाऊल टाकल्यवर विजेचा जोरदार करंट लागतो.

त्यामुळे या शो मध्ये बरेच स्पर्धक शो आर्ध्यातून सोडून जातात. जे सर्व खार्त्यावर मात करतात तेच या शोचे विजेते म्हणजे खतरों के खिलाडी ठरतात. अशात सध्या या शोचे ११ सीजन पूर्ण झाले असून १२ वा सीजन सुरू आहे.

यामध्ये शिवांगी जोशी, फैसल शेख, जन्नत जुबेर,कनिका मान,सृष्टी झा,चैतन्य पांडे,शिवांगी जोशी,अनेरी वैजनी, राजीव आदित्य, रुबीना दीलैक, तुषार कालिया, मोहित मलिक, निशांत भट, प्रतीक फेजपाल हे स्पर्धक आहेत. या शो मध्ये हे स्पर्धक शाभगी झाल्यापासून सगळीकडे याची चर्चा सुरू आहेत. अशात खेळ खेळण्याआधीच यातील एक स्पर्धक जखमी झाली आहे.

रुबीना दीलैक हिला शो मध्ये खेळण्या आधीच गंभीर दुखापत झाली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतं आहे. यामध्ये रोहित सर्व स्पर्धकांना नियम सांगत आहे. यावेळी रुबिना एका पोस्टर जवळ उभी आहे. हे पोस्टर हवेमुळे तिच्या पाठीवर पडताना दिसत आहे. यात तिला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच आता तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र यामुळे तिचे चाहते खूप चिंतेत आहेत.

रुबिना ही हिंदी मालिका विश्वातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. छोटी बहू ही तिची पहिली मालिका होती. यामालिकेतून तिने खूप प्रसिध्दी मिळवली. त्यानंतर तिने छोटी बहू २, सास बिना सासुराल, देवो के देव महादेव अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय केला आहे. आता ती जखमी असल्याने तिचे चाहते चिंतेत आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *