२५ प्रवशांचे प्राण वाचवून या वाहनचालकाने सोडला जीव

मुंबई| काही व्यक्ती एवढ्या देवा सारख्या असतात की, स्वतः चा जीव जाताना देखील त्या दुसऱ्यांचा विचार करत असतात. याचीच प्रचिती एका एस्टी चालकाने घडवून दिली आहे. शेवटच्या क्षणी या एस्टी चालकाने बसमध्ये असलेल्या २५ प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. मात्र हा एस्टी चालक आज आपल्यात नाही.

जलिंदर पवार हे एस्टी चालवत होते. या एस्टी मध्ये २५ प्रवाशी होते. अशात अचानक जालिंदर यांना चक्कर येऊ लागली त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी जर गाडी सुरू ठेवली असती तर यात २५ प्रवाशांचा जीव गेला असता. मात्र त्यांनी आपल्याला ठीक वाटत नाही आणि आपल्यावर २५ प्रवाशांची जबाबदारी आहे ही बाब लक्षात घेत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि आपला जीव सोडला.

या देव दुताच्या निधनाने सगळीकडे शोक पसरला आहे. ४५ वर्षीय जालिंदर पवार यांचा मृत्यू पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ झाला. जालिंदर रंगाराव पवार हे मुळचे सातारा जिल्ह्यातील, खटाव तालुक्यातील पळशी गावाचे रहिवासी होते. ते पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस म्हसवडकडे घेऊन जात होते. त्यावेळीच त्यांना मृत्यूची चाहूल लागली. त्यामुळे त्यांनी सगळ्यांचा जीव वाचवला आणि स्वतः या जगाचा निरोप घेऊन निघून गेले. बसचे वाहक संतोष गवळी यांनी नसरापूरच्या राजगड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत माहिती दिली.

दुपारी साडेबारा वाजता बस स्वारगेट आगारात पोहचली. यावेळी संतोष कांबळे यांनी जालिंदर पवार यांच्याकडे गाडी सोपवली. खेड शिवापूरचा टोलनाका ओलांडल्यानंतर बसचा वेग मंदावला त्यावेळेस संतोष यांनी जालिंदर यांना विचारणा केली तेव्हा चक्कर येतं असल्याचं सांगत त्यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतली. त्यांनी पवार यांना पुन्हा आवाज दिला मात्र पवार यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर कांबळे यांनी प्रवाशांच्या मदतीने पवार यांना नसरापूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *