फोटोत दिसणाऱ्या या डॉलने मराठीसह दक्षिणात्य सिनेसृष्टीही चांगलीच गाजवली

मुंबई | अभिनेत्री श्रुती मराठेने आज तमिळ आणि मराठी सिनेसृष्टीत मोठ नाव कमावले आहे. तिच्या अभिनयाची उत्तम पोच पावती म्हणजे तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग. मराठी बरोबरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत देखील तिचे खूप चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर तिचा बालपणीचा एक फोटो खूप व्हायरल होतं आहे.

यामध्ये तिने निळ्या रंगाचा एक ड्रेस घातला असून त्यावर लाल ओढणी घेतली आहे. तसेच केसात गजरा माळून डोक्यावर बिंदी लावली आहे आणि मस्त मेकअपमध्ये तिची क्यूट स्माईल तिची सुंदरता अधिक वाढतं असल्याचे दिसत आहे. या फोटोमध्ये ती अगदी एका डॉल सारखी सजली आहे. हा फोटो तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता.

तिने साल 2008 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट सनई चौघडेमधून मराठी चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल ठेवले. तसेच साल 2009 मध्ये आलेला तमिळ चित्रपट इंदिरा विझा यातून तमिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने तमिळमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले. नान अवनिलाई २ (२००९), गुरु शिष्यन (२०१०)

रामा माधव (२०१४), तप्तपदी (२०१४), बंध नायलॉन चे (2016) आणि बुधिया सिंग – बॉर्न टू रन (2016) या चित्रपटांमध्ये ती झळकली. रामा माधवमधील तिच्या भूमिकेबद्दल, एका समीक्षकाने असे म्हटले आहे की “पार्वतीबाई म्हणून, श्रुती मराठे युद्धातून आपल्या मृत पतीची वाट पाहत असलेल्या स्त्रीच्या रूपात परिपूर्ण पथ्ये समोर आणतात.”

बुधिया सिंग – बॉर्न टू रनच्या पुनरावलोकनात , एका समीक्षकाने नमूद केले की “परंतु आश्चर्यकारक बाब म्हणजे श्रुती मराठे ही बिरांची पत्नी गीता आहे. तिने मनोजच्या विरोधात प्रामाणिकपणे आपले पाऊल उचलले आहे. तिने पत्नीचा मार्मिक गोंधळ सहजतेने व्यक्त केला आहे”. तिने साल 2006 मध्ये”तिरुत्तू पायले” चा रिमेक “आडू आता आडू” या चित्रपटातून तिच्या कन्नड चित्रपटात पदार्पण केले .

श्रुतीने पेशवाई, राधा हाय बावरी, जागो मोहन प्यारे, माझ्या नवऱ्याची बायको, रुद्रकाल, रक्ताचा बोर्ड या मालिकेत देखील अभिनय केला आहे. पेशवाई या मालिकेमध्ये तिने रमाबाई पेशवे यांची भूमिका साकारली होती. मालिका विश्वातील ही तिची प्रथमच मालिका होती. या मालिकेमधून तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. तसेच हिंदी मालिका विश्वातील तिची कामगिरी देखील खूप गाजली.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *