मराठी बिग बॉसचा हा स्पर्धक जाणार बाहेर

मुंबई | एक-दोन कलाकार सोडले तर बाकी नवखे कलाकारच या शोमध्ये सहभागी झाल्याचे चित्र दिसत आहेत. नेहमीप्रमाणे बिग बॉसच्या चौथ्या सत्राचे सूत्रसंचालन दिग्गज अभिनेते महेश मांजरेकरच करत आहेत. मध्यंतरी या शोचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जाधव करणार असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या.

 

मात्र, त्यामध्ये काहीही तथ्य नव्हते. हा शो सुरु होण्याआधी देखील वादात सापडला होता. कारण की या बिग बॉसच्या शोचे प्रमोशन करण्यासाठी एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये एक अभिनेता आणि एक अभिनेत्री अंगवेक्षक करताना दिसत होती. त्यामुळे अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता आणि असे घाणेरडे व्हिडिओ दाखवणे योग्य नाही, म्हटले होते.

 

त्यानंतर अनेक जण त्यावर टीका करताना देखील दिसले होते. बिग बॉसच्या तिसऱ्या सत्रामध्ये देखील अतिशय दिग्गज असे कलाकार सहभागी झाले होते. विशाल निकम याने बिग बॉसच्या तिसऱ्या सत्रामध्ये बाजी मारली होती. आता या शोमध्ये प्रसाद जवादे, अमृता धोंडगे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशस्वी मसुरेकर यांच्यासह इतर कलाकार सहभागी झाले आहेत.

 

बिग बिग बॉसची चौथ सत्र सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रसाद जवादे आणि अपूर्वा नेमळेकर यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाल्याचे देखील पाहायला मिळाले. अपूर्व नेमळेकर हिने प्रसाद जवादे याला चांगलच धारेवर धरले होते आणि माझ्यासोबत असा फालतूपणा अजिबात करायचा नाही, अशी समज देखील तिने त्याला दिली होती.

 

मात्र, त्यानंतरही या दोघांमध्ये प्रचंड भांडणे झाल्याचे पाहायला मिळाले. बिग बॉस हा खेळ असा आहे की, यामध्ये एक विजेता आणि दुसरा उपविजेता ठरतो. बाकीच्या कलाकारांना बाहेर जावे लागते, तर आता बिग बॉसचा एक प्रोमो नुकताच समोर आला असून या प्रोमो मध्ये महेश मांजरेकर हे म्हणत आहेत की, तुमच्या तिघांपैकी बाहेर कोण जाणार आहे.

 

असे विचारून सगळ्या स्पर्धकांना ते विचारतात की, या तिघांपैकी बाहेर कोणाला काढायचे, त्यावर सर्वजण किरण माने यांचे नाव घेतात. किरण माने यांचे नाव घेतल्याबरोबर महेश मांजरेकर समृद्धीला म्हणतात की, समृद्धी तू कालपर्यंत बाबा बाबा म्हणत होती. आज त्यांचे नाव घेतले. त्यामुळे आता या शोच्या बाहेर किरण माने जातात की आणखीन कोणी सेलिब्रिटी जातो, हे आपल्याला लवकरच कळणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *