ही घानिष्ठ मैत्री आता एक तर्फीच चालु राहणार…, काळीज घट्ट करून प्रशांत दामलेंनी प्रदीप पटवर्धनांना दिला अखेरचा निरोप

मुंबई | काल प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीप पटवर्धन यांच्या अभिनयाची कारकीर्द फार मोठी आहे. त्यांनी रुपेरी पडद्याप्रमाणेच रंगमंच देखील तुफान गाजवला आहे. त्यामुळे त्यांची प्रसिद्धी आणि चाहता वर्ग अफाट आहे.

त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केलं. नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील बाबू कालिया हे पात्र खूप गाजले. बाबू कालियाला जिवंत करण्याचं काम प्रदीप पटवर्धन यांनी केलं. याचबरोबर त्यांनी एक दोन तीन चार, लावू का लाथ, चष्मेबहाद्दर, भुताळलेला अशा अनेक चित्रपटांमध्ये भारदस्त अभिनय केला. अगदी लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची गोडी होती.

सुरुवातीला त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये काम केले. त्यानंतर आपल्या अभिनयाचे जहाज त्यांनी व्यावसायिक नाटकांच्या दिशेने वळवले. त्यांच्या निधनाने काल संपूर्ण महाराष्ट्रावरती शोकसागर पसरला होता. अनेक चाहत्यांनी आणि कलाकार मंडळींनी सोशल मीडिया मार्फत आपले दुःख व्यक्त केले होते. अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील आपले दुःख एक पोस्ट शेअर करत व्यक्त केले आहे.

आपल्या मित्राच्या निधनामुळे प्रशांत दामले खूप दुःखी आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ” पट्या… प्रदीप पटवर्धन…
मी आणि प्रदीप.. आमची जोडी होती.. महाराष्ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, चल काहीतरीच काय, वेगळवेगळे चित्रपट, मालिका आम्ही एकत्र केल्या. सिद्धार्थ कॉलेज ची 5 वर्ष (1978 ते 1982) प्रायोगिक रंगभूमी आणि 1 जानेवारी 1985 ते आजपर्यंत व्यावसायिक रंगभूमी अशी आमची एकूण 44 वर्षांची दोस्ती.”

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “ही घानिष्ठ मैत्री आता एक तर्फीच चालु राहणार. मोरूची मावशी ह्या नाटकाचे आमचे तुफानी दौरे व्हायचे. विजय चव्हाण विजय साळवी, टाकळे, बिवलकर, वासंती निमकर, पट्या, मी असे विविध वयोगटातली नट मंडळी होती. त्यामुळे नुसता धुडगूस असायचा. नृत्यात त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हता. खुप आठवणी आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला शब्दात मांडण अत्यंत कठीण आहे. पट्या मी तुला खुप मिस करणार आहे यार” अशा भाऊक शब्दात प्रशांत दामले व्यक्त झाले आहेत.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *