‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील हे पात्र पुन्हा झळकणार

मनोरंजन | तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षांपासून सोनी सब या टेलिव्हिजनवर पहायला मिळते. यातील प्रत्येक पात्र हे लहानांपासून ते थोरा मोठ्यांच्या मनावर छाप पाडत आहे. जेठालाल, दयाबेन,बबिता, टप्पू असे बरेचसे कॅरेक्टर पहायला मिळतात. यातच आता या मालिकेत प्रेक्षकांना आवडणारी भूमिका लवकरच पुन्हा प्रेक्षकांपुढे येणार आहे.

 

मधल्या काळात या मालिकेतील अनेक भूमिका बदलल्या होत्या. त्यात महत्वाची भूमिका म्हणजे दयाबेन होय. दयाबेन ही भूमिका गेली तिन वर्षांपासून बदलली होती. अभिनेत्री दिशा वकानी बाळंतपणासाठी काही काळासाठी तीन मालिकेतून ब्रेक घेतला होता. परंतु तीन वर्ष उलटले तरी तिन मालिकेला पाठ फिरवली की काय ? असा सर्व चाहत्यांपुढ प्रश्न निर्माण झाला होता.

 

आता निर्माते असितकुमार मोदी हे मालिकेत दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानीला पुन्हा मालिकेत आणण्यावर ठाम आहेत. मात्र दिशाच दयाबेनच्या भूमिकेत परत येणार की दुसरी अभिनेत्री तिची जागा घेणार हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला मालिकेत दयाबेनची एण्ट्री करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

 

मालिकेसह अभिनेत्री दिशा आपल्या कुटुंबाचीही जबाबदारी घेत आहे. बाळंतपणासाठी तीन काही दिवस ब्रेक घेतला. यामुळं हिंदी मालिकेतील तारक मेहता का उलटा चष्मात दयाबेनला अभिनेत्री म्हणून पुन्हा या अशी निर्माते असित कुमार मोदी यांनी विनंती केली. परंतु घर जबाबदारी यामुळं दिशान बऱ्याचदा नकार दिला. नवरात्रीच्या मुहूर्तावर मालिकेत दयाबेन म्हणून कोणती अभिनेत्री प्रेक्षकांसमोर दिसणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Mr. Ganesh Chavan

Mr. Ganesh Chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *